Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News : वर्ध्याच्या मुख्य धरणात ५० टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा; टंचाईची समस्या मिटली 

Wardha News : यंदा पाणीटंचाईची झळ नागरिकांना सोसावी लागणार नाही. तरीही नागरिकांनी पाण्याचा काळजीने वापर करावा असं आवाहन पाटबंधरे विभागाने केला आहे

Rajesh Sonwane

चेतन व्यास
वर्धा
: वर्धा जिल्ह्यात यंदा पावसाने दमदार हजेरी लावली होती. यामुळे धरणाच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ होत काही धरण शंभर टक्के भरले होते. तर (Wardha) वर्धा शहराला पाणी पुरवठा करणारे मुख्य धरणात ७२ टाके पाणीसाठा असल्याने उन्हाळ्यात भासणारी पाणी टंचाईची समस्या मिटलेली आहे. (Live Marathi News)

वर्धा जिल्ह्यातील निम्न वर्धा, बोर आणि महाकाली येथील धाम प्रकल्प हे मुख्य धरण असून या धरणामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत असते. आजच्या परिस्थितीतही बोर प्रकल्प हे ७१ टक्के, निम्न वर्धा प्रकल्प ७८ टक्के आणि वर्धा शहराला पाणीपुरवठा करणारा महाकाली येथील धाम प्रकल्प हा ७२ टक्के भरला आहे. यामुळे यंदा पाणीटंचाईची (Water Crisis) झळ नागरिकांना सोसावी लागणार नाही. तरीही नागरिकांनी पाण्याचा काळजीने वापर करावा असं आवाहन पाटबंधरे विभागाने केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सिंचनासह उद्योगानाही मुबलक पाणी
रब्बी हंगामात जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पतून (Farmer) शेतकऱ्यांसाठी पाणी सोडले जातं असून शेतकऱ्यांना सिंचनाकरिता कोणतीही अडचण होताना दिसत नाही. तर दुसरीकडे उद्योगानांही देण्यात येणाऱ्या पाणीत कोणतीही कपात केली जाणार नसल्याची माहिती आहे. यामुळे या मान्सूनमध्ये झालेल्या पावसाचा फायदा आता सर्वाना होताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे सत्र न्यायालयाने नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल २९ जूनला देणार

Nasrapur Case : नसरापूर बलात्कार प्रकरणात आरोपी दोषी, सोमवारी कोर्ट शिक्षा सुनावणार

Marathi Serial : ४ वर्षांचा प्रवास अखेर संपणार; लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, चाहते नाराज

Lohgad Case: ‘केतन जिवंत आहे’ ऐकताच सियाचा थरकाप उडाला थरकाप; लोहगड तरूणाच्या हत्येप्रकरणी मोठा गौप्यस्फोट समोर

Qutb Minar : जगातील सर्वात उंच विटांची मिनार! कुतुब मिनारला 'कुतुब' नाव कसे मिळाले? वाचा खास कनेक्शन

SCROLL FOR NEXT