Solar Energy Saam tv
महाराष्ट्र

सौर ऊर्जेच्या प्रकाशात झळकणार गाव; विदर्भातील पहिले ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ बनले चिचघाट, Special Report

Wardha News : प्रधानमंत्री सूर्य घर मोफत योजनेच्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता हेमंत पावडे यांच्या मार्गदर्शनात ‘मॉडल सोलर व्हिलेज’ या अंतर्गत विद्युत विभागाकडून उपक्रम राबविण्यात आला

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाशाची उपलब्धता असूनही सौरऊर्जेचा फार कमी उपयोग केला जातो. मात्र, अलीकडच्या काळात घरांवर सोलर पॅनल लावून सौर एनर्जीचा वापर करण्यास सुरवात झाली आहे. शहरांमध्ये हे प्रमाण अधिक असून ग्रामीण भागात मात्र क्वचित ठिकाणी सोलर पॅनल लावलेले पाहण्यास मिळतात. मात्र हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट (राठी) हे गाव याला अपवाद ठरले आहे. गावात सर्व काम आता सौरऊर्जेच्या वापरावरच करण्यात येणार आहे. यामुळे चिचघाट हे गाव विदर्भातील पहिले सोलर मॉडेल व्हिलेज ठरले आहे. 

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट (राठी) गाव अवघ्या १८७ लोकसंख्या असलेले तसेच ७० घरे असलेले गाव आहे. शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीजवळ हे गाव वसले आहे. या गावात केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्य घर मोफत योजनेच्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता हेमंत पावडे यांच्या मार्गदर्शनात ‘मॉडल सोलर व्हिलेज’ या अंतर्गत विद्युत विभागाकडून उपक्रम राबविण्यात आला. अवघ्या तीन महिन्यातच हा प्राेजेक्ट पूर्ण करुन चिचघाट गाव विदर्भातील पहिले सौरग्राम ठरले आहे.

बँकेचे १०० टक्के अर्थसहाय्य्य  

प्रकल्प उभारणीसाठी विविध अडचणींचा सामना करत विद्युत विभागाने बँक ऑफ बडोदा यांच्या संयुक्त वतीने कार्यशाळा घेत गावकऱ्यांचे प्रबोधन करत प्रकल्प उभारणीच्या दिशेने वाटचालीला सुरुवात केली. या प्रकल्पासाठी शंभर टक्के शासकीय बँकेचे अर्थसहाय्य देखील लाभले. मात्र, बँक फायनान्स दरम्यान अनेक अडचणींमुळे प्रकल्प मार्गी लागणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण होऊ लागली होती. मात्र, विद्युत विभागातील अधिकारी आणि कार्यकारी अभियंता पावडे यांनी सर्व अडचणींवर मात करत प्रकल्पाला गती दिली. 

कौलारू घरांवरही बसविले पॅनल 

सौर प्रकल्पासाठी येणाऱ्या त्रुटी दूर सारत लाभार्थ्यांना योजनेचा लाभ कसा मिळवून देता येईल; याबाबत प्रयत्न करुन प्रकल्पाला चालना दिली. परिणामी, चिचघाट हे गाव शंभर टक्के सौरग्राम ठरले आहे. विशेष म्हणजे यासाठी बँक ऑफ बडोदा ही महत्वाचा दुवा ठरली. शासनाच्या जन समर्थ या पोर्टलद्वारे सौर प्रकल्पासाठी आवश्यक असलेले अर्थसहाय्य बँकेने मिळवून दिले. चिचघाट (राठी) गावात आवश्यकतेनुसार ७० रहिवासी असलेल्या घरांना सौरऊर्जा पॅनलची जोडणी करण्यात आली आहे. यामध्ये अपवादात्मक परिस्थितीवर मात करत २८ टीनांच्या आणि काैलारु घरे असलेल्या रहिवासी नागरिकांना देखील या योजनेचा लाभ देण्यात आला असून त्यांचेही नियोजन करण्यात आले आहे.

अवघ्या तीन महिन्यात प्रकल्प पूर्ण 

सौरऊर्जा प्रकल्पाला गती देण्यासाठी विद्युत विभागातील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. अवघ्या तीन महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करुन विदर्भात सौरऊर्जेला चालना देण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. हिंगणघाट उपविभागातील विद्युत अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा पाया रचून या प्रकल्पाला मूर्तरुप दिले आहे. त्यामुळे हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट (राठी) गाव आता सौर ऊर्जेच्या प्रकाशात झळकणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

SCROLL FOR NEXT