Leopard Attack : घराजवळ बिबट्या दबा धरून बसला होता, आजी बाहेर येताच तुटून पडला, नंतर घडलं ते भयंकर...

Nandurbar News : नंदुरबार जिल्हा हा सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी आहे. यात तळोदा तालुक्यातील बहुतांश गावे, पाडा जंगल परिसरात आहे. यामुळे या भागांमध्ये वन्य प्राण्यांचा वावर कायम पाहण्यास मिळतो
Leopard Attack
Leopard AttackSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या तळोदा तालुक्यातील खुर्चीमाड या गावात एका ८० वर्षीय वृध्द आदिवासी महिलेवर बिबट्याने हल्ला केला. वृद्ध महिलेला बिबट्याने काही अंतरापर्यंत फरफटत नेले होते. यात वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरची घटना आज सकाळच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

नंदुरबार जिल्हा हा सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी आहे. यात तळोदा तालुक्यातील बहुतांश गावे, पाडा जंगल परिसरात आहे. यामुळे या भागांमध्ये वन्य प्राण्यांचा वावर कायम पाहण्यास मिळत असतो. बिबट्यांचा वावर गाव वस्त्यांपर्यंत झाला असून बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना जिल्ह्यात कायम घडत आहेत. त्यानुसार तळोदा तालुक्यात आज पुन्हा बिबट्याने हल्ला केल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. तळोदा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत ७ जणांचा मृत्यू तर ३३ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. 

Leopard Attack
Nandurbar Corporation : नंदुरबारमधील नाट्य मंदिराला लागले सील; करापोटी ३६ लाख थकल्याने नगरपालिकेची कारवाई

घराबाहेर निघताच झडप  
तळोदा तालुक्यातील खुर्चीमाड या गावात सदरची घटना घडली असून वृद्ध महिला शौचालयासाठी घराच्या बाहेर निघालेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली. बिबट्याने हल्ला करत ५०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले होते. यामुळे वृद्ध महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. हल्ला करून अर्धवट खाल्ल्याच्या स्थिती मृतदेह आढळून आला होता. यामुळे गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे. तर वनविभाग घटनास्थळी दाखल वृद्ध महिलेचा मृत्यूदेह शुभविच्छेदनासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. 

Leopard Attack
GST Fraud : बनावट कंपन्यांसोबत व्यवहार करत १० कोटी ८३ लाखाचा जीएसटी बुडविला; सोलापुरातील दोन व्यापारी भावांना अटक

वाघाच्या हल्ल्यात एक म्हैस ठार
भंडारा
: भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या गर्रा/बघेडा- पांगडी जंगलात वाघाच्या हल्यात एक म्हैस जागीच ठार झाली. तर एक म्हैस जखमी झाल्याची घटना घडली. सुरडोह पुनर्वसन येथील पशुपालक शेतकरी नवलदास नैताम यांनी गर्रा/बघेडा - पांगडी जंगल परिसरात म्हशी चारण्यासाठी गेला होता. म्हशी जंगल परिसरात चराई करीत असतांना दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक दोन म्हशीवर हल्ला चढवीला. त्यात एका म्हशीला ठार केले; तर दुसऱ्या म्हशीलाही गंभीर जखमी केले. सदर घटनेची माहिती मिळताच नाकाडोंगरी वनपरिक्षेत्राचे वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com