Nandurbar Corporation : नंदुरबारमधील नाट्य मंदिराला लागले सील; करापोटी ३६ लाख थकल्याने नगरपालिकेची कारवाई

Nandurbar News आर्थिक वर्ष समाप्तीवर असल्याने महापालिका, नगरपालिकेकडून थकीत कराची रक्कम वसूल करण्याची मोहीम राबविली जात आहे त्यानुसार नंदुरबार नगरपालिकेने देखील वसुली मोहीम राबविण्यास सुरवात केली
Nandurbar Corporation
Nandurbar CorporationSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील वैभव असलेले शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराचे मालमत्ता कर न भरल्याने नंदुरबार नगरपालिकेने मोठी कार्यवाही केली आहे. नाट्य मंदिराचे गेल्या वर्षभरापासून थकीत असलेले मालमत्ता कर न भरल्याने ही कारवाई करण्यात आली असून नगरपालिकेकडून नाट्य मंदिराला सील लावण्यात आले आहे. तसेच थकीत कराबाबत नोटीस देखील लावण्यात आली आहे. 

आर्थिक वर्ष समाप्तीवर असल्याने महापालिका, नगरपालिकेकडून थकीत कराची रक्कम वसूल करण्याची मोहीम राबविली जात आहे. प्रामुख्याने मोठे थकबाकीदारांवर लक्ष आहे. त्यानुसार नंदुरबार नगरपालिकेने देखील वसुली मोहीम राबविण्यास सुरवात केली असून थकबाकीदारांना नोटीस देत कारवाई करण्यात येत आहे. या कारवाई अंतर्गतच नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराला सील लावण्यात आले आहे. 

Nandurbar Corporation
Mahavitaran : वीजचोरट्यांवर कारवाईचा बडगा; वर्धा जिल्ह्यात ८२६ वीज चोरांना सव्वा कोटींचा दंड

वर्षभर चालतात कार्यक्रम 

नंदुरबारच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात वर्षभर लग्न समारंभ शासकीय आणि धार्मिक कार्यक्रम यासह विविध लहान- मोठे कार्यक्रम होत असतात. मात्र एवढं असून देखील मालमत्ता कर का भरण्यात आला नाही हा मोठा प्रश्न असून पालिकेने आता नाट्यमंदिर सिल केले असून प्रवेशद्वारावर नोटीस देखील लावण्यात आलेली आहे. आता थकीत कराची रक्कम भरल्यानंतर सील काढण्यात येणार असल्याचे पालिकेची भूमिका आहे. 

Nandurbar Corporation
Bogus Seeds : शेतकऱ्यांना दिले टरबुजाची बोगस बियाणे; दुबार लागवडीनंतरही उगवण नाही, शेतकऱ्यांना फटका

३६ लाख थकीत 

नंदुरबार शहरातील शिवाजी महाराज नाट्य मंदिराचे एकूण ३६ लाख वीस हजार रुपये एवढा मालमत्ता कर थकीत झाला आहे. तो वेळेवर न भरल्यामुळे नंदुरबार नगरपालिका ॲक्शन मोडवर आली असून आता नाट्यमंदिर हे पालिकेच्या वतीने सील करण्यात आले आले आहे. नंदुरबार नगरपालिकेला पवन दत्ता या सनदी अधिकाऱ्यांनी नुकतीच मुख्याधिकारी पदाची धुरा सांभाळल्यानंतर मोठ्या प्रमाणात शहरात कारवाया करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com