Mahavitaran
MahavitaranSaam tv

Mahavitaran : वीजचोरट्यांवर कारवाईचा बडगा; वर्धा जिल्ह्यात ८२६ वीज चोरांना सव्वा कोटींचा दंड

Wardha News : वीज चोरांविरोधातील मोहीम अधिक आक्रमक करण्याचा निर्णय महावितरणतर्फ़े घेण्यात आला आहे. यात सदोष मीटर, सरासरी वीज बिल असणाऱ्या सर्वच ग्राहकांची तपासणी करण्याला सुरुवात देखील करण्यात आली
Published on

चेतन व्यास 
वर्धा
: महावितरणकडून राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत एप्रिल ते डिसेंबर २०२४ या नऊ महिन्यांत वर्धा जिल्ह्यातील ८२६ ठिकाणी थेट वीजचोरी करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. या सोबतच प्रत्यक्ष कारणाव्यतिरिक्त इतर कारणासाठी अथवा अप्रत्यक्ष वीज वापर करणाऱ्या ४४ ग्राहकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यात जवळपास १ कोटी २८ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

वीज चोरांविरोधातील मोहीम अधिक आक्रमक करण्याचा निर्णय महावितरणतर्फ़े घेण्यात आला आहे. या मोहिमेत सदोष मीटर, सरासरी वीज बिल असणाऱ्या सर्वच ग्राहकांची तपासणी करण्याला सुरुवात देखील करण्यात आली आहे. तसेच थकबाकीपोटी कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेले सवलत देऊनही अभय योजनेत सहभागी झाले नसलेल्या ग्राहकांविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय देखील महावितरणने घेतला आहे. त्यानुसार वर्धा जिल्ह्यात मोहीम राबविण्यात येत आहे. 

Mahavitaran
Shirdi Saibaba Mandir : वातानुकूलित दर्शन कॉम्प्लेक्स, वर्षाला ३ कोटी भाविक घेतात साई बाबाचं दर्शन, कशी आहे दर्शन व्यवस्था?

वीज चोरी करणाऱ्या ८२६ ग्राहकांनी तब्बल १ कोटी २८ लाख रुपयांच्या ७ लाख ४३ हजार ८७८ युनिटची वीजचोरी केल्याचे निदर्शनास आले. वीजचोरी पोटी देयकांसह ८१५ ग्राहकांना तडजोडीपोटी २५ लाखाचा दंड ठोठविण्यात आला आहे. या ८२६ ग्राहकांमध्ये तारांवर आकडा टाकून वीजचोरी करणाऱ्या २३७ ग्राहकांचा तर ५८९ ग्राहकांनी प्रत्यक्ष मीटरमध्ये छेडछाड, मीटर बंद पाडणे, मीटर दुरून बंद करण्यासाठी रिमोटचा वापर करणे, छिद्र करून मीटरमध्ये रोध निर्माण करणे किंवा मीटरची गती संथ करणे या माध्यमातून थेट वीजचोरी केली आहे.

Mahavitaran
Sangli Crime : आरग येथे पद्मावती मातेच्या मंदिरातून १८ तोळे सोने चोरी; चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद

अप्रत्यक्ष वापर करणाऱ्या ४४ जणांवर कारवाई 

याशिवाय प्रत्यक्ष कारणाव्यतिरिक्त इतर कारणासाठी अथवा अप्रत्यक्ष वीज वापर करणाऱ्या ४४ ग्राहकांना १ हजार ३७६ युनिट वीजेचा अप्रत्यक्ष वापर केल्या प्रकरणी ६ लाखांचे देयक आकारण्यात आले आहे. वीजचोरी पकडण्यासाठी महावितरण सातत्याने वीजचोरी विरोधात मोहीम राबवते. हि धडक मोहीम यापुढे देखील कायम राहणार असल्याचे महावितरण कडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com