Bogus Seeds : शेतकऱ्यांना दिले टरबुजाची बोगस बियाणे; दुबार लागवडीनंतरही उगवण नाही, शेतकऱ्यांना फटका

Dharashiv News : धाराशिवच्या खोंदला गावातील शेतकऱ्याला टरबुजाच्या बोगस बियाणाचा फटका बसला आहे. खोंदला येथील शेतकरी बाळासाहेब अरविंद लांडगे यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रावर टरबुजाची लागवड केली
Bogus Seeds
Bogus SeedsSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 

धाराशिव : धाराशिवच्या खोंदला गावातील शेतकऱ्याला टरबुजाच्या बोगस बियाणाचा फटका बसला आहे. या शेतकऱ्यांनी लागवड केल्यानंतर बियाण्याची उगवण न झाल्याने दुबार लागवड केली. यानंतर देखील महिनाभराचा कालावधी उलटून देखील टरबुजाची बियाणे उगवलेच नाही. यामुळे नामदेव उमाजी ॲग्रीटेक कंपनी विरोधात शेतकऱ्याची बोगस बियाणांची तक्रार केली असून शेतकऱ्याकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे. 

धाराशिवच्या खोंदला गावातील शेतकऱ्याला टरबुजाच्या बोगस बियाणाचा फटका बसला आहे. खोंदला येथील शेतकरी बाळासाहेब अरविंद लांडगे यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रावर टरबुजाची लागवड केली. मात्र बियाणे उगवले नाही. थंडीमुळे बियाणे उगवले नसल्याच्या अंदाजाने लांडगे यांनी दुबार लागवड केली. तरीही बियाणे उगवले नाही. शेतीत लावलेल्या बियाणाला अंकुरच फुटत नसल्याचं लक्षात आल्यावर नामदेव उमाजी ॲग्रीटेक कंपनीचं बियाणं बोगस असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केली

Bogus Seeds
Sangli Crime : आरग येथे पद्मावती मातेच्या मंदिरातून १८ तोळे सोने चोरी; चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद

कृषी विभागाकडून शेतीचा पंचनामा

दरम्यान शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर कृषी विभागाकडून शेतात पीक पंचनामा करण्यात आला आहे. दोनदा बियाणे घेऊन लागवड केल्यानंतर देखील बियाणे न उगवल्याने शेतकऱ्याचे मोठं नुकसान झालं आहे. यामुळे शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी; अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. 

Bogus Seeds
Mahavitaran : वीजचोरट्यांवर कारवाईचा बडगा; वर्धा जिल्ह्यात ८२६ वीज चोरांना सव्वा कोटींचा दंड

हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव
नांदेड
: नांदेड जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा अर्थीक संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा विविध संकटाचा सामना करत एक लाख ६८ हजार १२७ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी केली आहे. सध्या हरभऱ्याचे पीक फुलावर असतानाच त्यावर वातावरण बदलामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या रोगामुळे हरभऱ्याचे पीक पिवळे पडून वाळू लागले आहे. अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी अडचणीत सापल्याच चित्र उमरी परिसरात पहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com