Bribe Case : सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी लाच; पाच हजारांची लाच घेणारा तलाठी ताब्यात

Jalgaon News : मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा- काकोडा याठिकाणी त्यांची वडिलोपार्जित जमीन आहे. जमीनीवर त्यांचे वडील, काका, आत्या व मृत काकांच्या मुलांचे नावे सात बारा उताऱ्यावर लावण्यात आलेले नव्हते
Bribe Case
Bribe CaseSaam tv
Published On

मुक्ताईनगर (जळगाव) : वडिलोपार्जित असलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी शासकीय फी भरायची नसल्यास तलाठ्याने संबंधितांकडे पैशांची मागणी केली. याकरिता पाच हजार रुपयांची मागणी करत रक्कम स्वीकारताना मुक्ताईनगरच्या कुऱ्हा येथील तलाठ्यासह दोन खासगी व्यक्तींना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. जळगाव जिल्ह्यात सलग दोन दिवसात लाच घेतल्याप्रकारणी तलाठ्यांना ताब्यात घेतले आहे.  

जळगाव शहरातील रहिवासी असलेल्या तक्रारदाराचे मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा- काकोडा हे मूळ गाव आहे. याठिकाणी त्यांची वडिलोपार्जित जमीन आहे. ११९७ मध्ये त्यांचे आजोबा मृत झाले होते. आजोबांच्या नावावर जमीनीवर त्यांचे वडील, काका, आत्या व मृत काकांच्या मुलांचे नावे सात बारा उताऱ्यावर लावण्यात आलेले नव्हते. यामुळे तक्रारदाराने ७ ते ८ दिवसांपूर्वी कुऱ्हा गावातील तलाठी प्रशांत प्रल्हाद ढमाळे (वय ४२) यांना सात बारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी किती खर्च येतो याबाबत माहिती विचारली. 

Bribe Case
GST Fraud : बनावट कंपन्यांसोबत व्यवहार करत १० कोटी ८३ लाखाचा जीएसटी बुडविला; सोलापुरातील दोन व्यापारी भावांना अटक

पाच हजार रुपयांची केली मागणी 

यावेळी तलाठी ढमाळे यांनी प्रत्येक वर्षाचे २२० रुपयांप्रमाणे ६ हजार रुपये शासकीय फी भरावी लागेल. शासकीय फी भरायची नसेल तर मला पाच हजार रुपये द्यावे लागतील. तुमचे काम करून देईल, असे तलाठी ढमाळे यांनी सांगितले. मात्र सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तलाठ्याला पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार एसीबीच्या पथकाने शहानिशा करून सापळा रचला. 

Bribe Case
Leopard Attack : घराजवळ बिबट्या दबा धरून बसला होता, आजी बाहेर येताच तुटून पडला, नंतर घडलं ते भयंकर...

तिघेजण एसीबीच्या ताब्यात 

जळगाव लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे डीवायएसपी योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचत पाच हजारांची रक्कम स्वीकारताच पथकाने तलाठी ढमाळे (वय ४२) यांना ताब्यात घेतले. याशिवाय त्यांच्यासोबत असलेले कुऱ्हा गावातील अरुण शालिग्राम भोलानकार आणि संतोष प्रकाश उबरकर या दोघांना ताब्यात घेतले. त्या तिघांविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com