Ranjit Kamble Saam tv
महाराष्ट्र

Wardha News : आमदार कांबळेंवर अदखल पात्र गुन्हा; मारहाण केल्याबाबत ग्रामपंचायत सदस्याची होती तक्रार

Wardha News : सदस्याने ग्रामपंचायतच्या कार्यक्रमात दारू पीऊन अश्लील शिवीगाळ करत कार्यक्रम बंद पडण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार केली आहे

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात प्रश्न विचारल्याने आमदार रणजित कांबळे यांनी मारहाण केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्याने पोलिसात (Police) केली होती. या तक्रारीवरून देवळी पोलिसात (Wardha) आमदार कांबळे यांच्या विरुद्ध अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (Maharashtra News)

वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्याच्या सोनेगाव बाई येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन ग्रामपंचायतकडून सुरु होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश सातव यांनी आमदारांना प्रश्न विचारले असता आमदार रणजित कांबळे यांनी मारहाण केली. अशी तक्रार घटनेच्या दोन दिवसानंतर देवळी पोलिसात करण्यात आली होती. यावर देवळी पोलीसांनी आमदार कांबळे विरुद्ध अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या व्यतिरिक्त ग्रामपंचायत सदस्याने ग्रामपंचायतच्या कार्यक्रमात दारू पीऊन अश्लील शिवीगाळ करत कार्यक्रम बंद पडण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार केली आहे. सरपंच यांनी दिलेल्या तक्रारीची चौकशी सुरु असल्याची माहिती देवळीचे ठाणेदार भानुदास पिदूडकर यांनी दिली. आता या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते, हे पाहावं लागेल. विशेष म्हणजे ज्या सदस्याच्या तक्रारीवरुन आमदार विरुद्ध अदखल पात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्या सदस्यावर अवैध दारुविक्री केल्याचा गुन्हा दाखल असल्याच त्याने स्वतः भाजपाकडून खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत कबूल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Maharashtra News Live Updates: ही तर गुजरात नवनिर्माण सेना; उद्धव ठाकरेंची टीका

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

Eknath Shinde : मला जेलमध्ये टाका, मी काय ऐरागैरा नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर नेम

Assembly Election: पक्षाने अजित पवारांना तीनदा उपमुख्यमंत्री बनवलं, आता युगेंद्र; सांगता सभेत शरद पवारांचे आवाहन

SCROLL FOR NEXT