सरकारी कर्मचाऱ्यानं स्वतःला संपवण्याचा केला प्रयत्न; पत्नीची पोलिसांत तक्रार, भाजप आमदारावर गंभीर आरोप

हिंगणघाट येथे घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली आहे. या प्रकरणी आता काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Mla Sameer Kunawar
Mla Sameer Kunawarsaam tv
Published On

- चेतन व्यास

Wardha News : हिंगणघाटचे भाजपचे आमदार समीर कुणावार (mla samir kunawar) यांच्या त्रासामुळे माझे पतीने जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याचे परिरक्षण भुमापक प्रशांत बबनराव येते (prashant yete) यांच्या पत्नीने पाेलीसांत तक्रार केली आहे. दरम्यान या घटनेशी आपला काेणताही संबंध नाही असे साम टीव्हीच्या प्रस्तुत प्रतिनिधींशी दूरध्वनीवरुन बाेलताना आमदार समीर कुणावर यांनी नमूद केले. खरंतर याबाबत काेणतीच अधिकृत प्रतिक्रिया द्यायची नाही असेही कुणावर यांनी पुढे बाेलताना स्पष्ट केले. (Maharashtra News)

Mla Sameer Kunawar
Maharashtra Government Declares Drought : 'दुष्काळ जाहीर करा अन्यथा सरकारला न्यायालयात खेचणार'; नेते मंडळी आक्रमक (पाहा व्हिडिओ)

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील तालुका भूमिअभिलेख कार्यालयात हिंगणघाटचे भाजपा आमदार समीर कुणावार यांनी उपविभागीय महसूल अधिकारी व तहसीलदारांसोबत सोमवारी भेट दिली. नागरिकांच्या कार्यालयाबाबत येणाऱ्या तक्रारी संदर्भात ही आकास्मिक भेट असल्याच सांगितलं गेले.

तेथूनच आमदारांनी महसूलमंत्री यांच्याशी फोनचे लाउडस्पीकर चालू करून संवाद केला. यात आमदारांनी कार्यालयाच्या तक्रारीचा पाढा मंत्र्यासमाेर वाचला. दुसऱ्या दिवशीही नागपूरच्या अधिकाऱ्यांसह आमदारांनी पुन्हा कार्यालयात धडक दिली. या कार्यालयातील कागदाची पडताळणी झाली. या दरम्यानच आमदारांनी कार्यालयातील परिरक्षण भुमापकाला कामाबाबत जाब विचारला. याबाबत कर्मचा-याने साम टीव्हीशी बाेलताना आमदारांवर गंभीर आराेप केले आहेत.

दरम्यान त्यानंतर परिरक्षण भुमापक प्रशांत येते यांनी बस स्थानक परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला. या कर्मचाऱ्यावर सध्या सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या कर्मचाऱ्याने हिंगणघाट पोलीसांत आमदार कुणावार यांच्या विराेधात तक्रार दिली. तसेच येते यांच्या पत्नीने सेवाग्राम रुग्णालयात आमदारांच्या विराेधात पाेलीसांना तक्रार अर्ज देत कारवाईची अपेक्षा बाळगली आहे.

दरम्यान कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारी संदर्भात सेवाग्राम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांनी याबाबत बाेलण्यास नकार दिला. घटनास्थळ हे हिंगणघाट येथील असून आम्ही जबाब घेऊन पुढील कारवाईसाठी हिंगणघाट पोलीसांकडे पाठविल्याचे त्यांनी सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आमदार समीर कुणावार यांनी साम टीव्हीशी बाेलताना ही शासकीय भेट होती. उपविभागीय महसूल अधिकारी पूर्णवेळ आमच्या सोबत होते. त्यांची प्रतिक्रिया घ्यावी. या प्रकारणाशी माझा संबंध नाही असेही कुणावार यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Mla Sameer Kunawar
Ravikant Tupkar News : मंत्र्यांना विमा कंपन्यांकडून पैसे जातात; रवीकांत तुपकरांचा माेदी सरकारवर गंभीर आराेप

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com