wardha citizens morcha against directors of shetkari mahila nidhi bank Saam Digital
महाराष्ट्र

Wardha: शेतकरी महिला निधी बँकेच्या ठेवीदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, अधिवेशनात आवाज उठवणार: आमदार पंकज भाेयर

wardha citizens morcha against directors of shetkari mahila nidhi bank : या बॅंकेचे संचालक शरद कांबळे यांनी वाॅटर पार्कसह इतर मालमत्ता खरेदी केल्याचा आराेप हाेऊ लागला आहे. ठेवीदारांना चार महिन्यांपासून केवळ तारखा मिळत आहेत.

Siddharth Latkar

- चेतन व्यास

ठेवी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी आज (गुरुवार) वर्धा येथे शेतकरी महिला निधी बँकेच्या विराेधात जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढला. यावेळी माेर्चेकरांनी संचालकांची मालमत्ता जप्त करावी अशी मागणी सरकारला केली.

शेतकरी महिला निधी बँकेत वर्धा जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये अडकले आहे. या बँकेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. ठेवीदारांना वेळेत पैसे मिलत नसल्याने बँकेच्या संचालकाने नागरिकांच्या पैशावर स्वतःसाठी मालमत्ता खरेदी केल्याचा आराेप हाेऊ लागला आहे.

आज संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत शरद कांबळे यांची मालमत्ता शासनाने ताब्यात घ्यावी अशी मागणी केली. या मोर्चात वर्धेचे आमदार पंकज भोयर हे देखील सहभागी झाले हाेते.

अधिवेशनात आवाज उठवणार : आमदार पंकज भोयर

शेतकरी महिला निधी बँकेत जवळपास 28 कोटी रुपये नागरिकांचे अडकले आहे. हे पैसे नागरिकांना परत कसे लवकर मिळतील या दृष्टीने शासनान तातडीने पावलं उचलावी. येत्या अधिवेशनात हा मुद्दा उचलणार असून नागरिकांच्या ठेवी परत मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील असे आश्वासन आमदार पंकज भोयर (mla pankaj bhoyar) यांनी दिले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस, भिडे पूल पाण्याखाली

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT