Wardha: स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेला स्थगिती द्या, काॅंग्रेस कार्यकर्त्यांसह वर्धेकरांची मागणी; जाणून घ्या कारण

Wardha Congress Party Workers Protest Against Prepaid Smart Meters: प्रती मीटर १२ हजार रुपये खर्च नवीन मीटर लावण्यासाठी येतो असे नागरिकांचे म्हणणे आहे.
wardha citizens and congress party workers protest against prepaid smart meters
wardha citizens and congress party workers protest against prepaid smart meters Saam Digital

- चेतन व्यास

वर्धा येथे वीज वितरण कंपनीच्या स्मार्ट मीटर लावण्याच्या कार्यवाहीबद्दल संताप व्यक्त होत आहे. ही कार्यवाही तत्काळ स्थगित करण्याची मागणी काँग्रेस कमिटीचे माजी शहराध्यक्ष सुधीर पांगूळ यांनी कार्यकारी अभियंता यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

केंद्र व राज्य सरकारने नॅशनल स्मार्ट ग्रीड मिशन अंतर्गत प्रीपेड स्मार्ट वीज मीटर ग्राहकाच्या घरी लावण्याची मोहीम वीज वितरण कंपनी द्वारा वर्धा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सर्व सामान्य ग्राहकाला ही योजना आर्थिक दृष्ट्या परवडणारी नाही असा सूर उमटू लागला आहे.

wardha citizens and congress party workers protest against prepaid smart meters
Dharashiv : 10 दिवसांपूर्वी झाला हाेता विवाह, पतीला पत्नीचा पाहावा लागला मृतदेह; नेमकं काय घडलं नळदुर्ग किल्ल्यात?

प्रती मीटर १२ हजार रुपये खर्च नवीन मीटर लावण्यासाठी येतो. स्मार्ट मीटर मध्ये प्रथम रिचार्ज करावे लागेल. रिचार्ज संपताच वीज पुरवठा खंडित होईल. यामुळे सर्वसामान्य ग्राहकाचे आर्थिक बजेट कोलमाडण्याची शक्यता आहे.

विद्यमान स्थितीत दोन महिने विज बिल भरणा केला नाही तरी वीज पुरवठा खंडित होत नाही. वीज बिलाचे खंड पडून वीज बिल भरण्याची सवलत होती. स्मार्ट मीटर मधील रिचार्ज अचानक बेरात्री संपल्यामुळे चोरीसारखे गुन्हेगारी प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे.

रिचार्ज अभावी अचानक वीज बंद पडल्याने लहान मुले, आजारी व्यक्ती, वृद्ध यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. स्मार्ट मीटर लावण्याची कार्यवाही तत्काळ स्थगित करण्याची मागणी निवेनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन काँग्रेस कमिटीचे माजी शहराध्यक्ष सुधीर पांगूळ यांनी कार्यकारी अभियंता यांना दिले. त्यावेळी पंकज इंगोले, चंद्रशेखर घोडे, अभिजित चौधरी, मोहित ठाकरे, सतिश लांबट, देवा कोटमंकार यांची उपस्थिती होती.

Edited By : Siddharth Latkar

wardha citizens and congress party workers protest against prepaid smart meters
Sindhudurg : विद्युत वाहिनी तुटून अंगावर पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू, सावंतवाडी तालुक्यातील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com