Santosh Deshmukh Case Walmik Karad Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार

Beed Crime : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराड नंबर १ चा गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या आरोपपत्रात म्हटले आहे. खंडणी प्रकरणावरुनच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Yash Shirke

Santosh Deshmukh Walmik Karad : बीडच्या मस्साजोग गावातले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण महाराष्ट्रात खूप गाजले. या प्रकरणात राजकीय नेत्यांची नावे जोडल्याने त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले. दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्यांपासून अधिकचा कालावधी झाला तरीही, दोषींवर कारवाई न झाल्याने संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणाशी संबंधित खळबळजनक माहिती समोर आली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा वाल्मीक कराडच आहे असे सीआयडीने म्हटले आहे. या प्रकरणात आरोपपत्र पोलिसांकडून दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रामधून कराड हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे असे नमूद करण्यात आले आहे. वाल्मीक कराडभोवती कारवाईचा फास पूर्णपणे आवळला गेला आहे.

पोलिसांच्या दोषपत्रानुसार,

१. वाल्मीक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार

२. विष्णू चाटेचा आरोपी नंबर २ असा उल्लेख

३. २९ नोव्हेंबरला सुदर्शन घुलेच्या फोनवरुन कराडने मागितली खंडणी

४. ६ डिसेंबरला संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळेशी वाद

५. खंडणी, अ‍ॅट्रॉसिटी, हत्येच्या घटनांचा आरोपपत्रात एकत्रित उल्लेख

५ गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराडविरुद्ध सबळ पुरावे मिळाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्याशिवाय सुदर्शन घुले हा संतोष देशमुख याना मारहाण करतानाचा व्हिडीओही सीआयडीजवळ आहे. वाल्मीक कराडने आवादा कंपनीला खंडणी मागितली. त्यातून झालेल्या वादानंतर हत्या झाल्याचेही समोर आले आहे. आवादा पवनचक्की प्रकल्पाचा प्रोजेक्ट मॅनेजर सुनील केंदू शिदे यांना दोन कोटी रुपयांची खंडणी वाल्मीक कराडने विष्णू चाटेचा फोन वापरुन मागितली होती.

दरम्यान वाल्मीक कराडवर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर तो फरार झाला. पुढे वाल्मीक कराडने सीआयडीसमोर शरणागती पत्करली. खंडणी प्रकरणावरुन त्याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान पोलिसांनी अन्य आरोपींनाही ताब्यात घेतले होते. आरोपपत्रानंतर आता लवकरच कारवाईला सुरुवात होईल असे लोक म्हणत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

SCROLL FOR NEXT