TCS Manger: बायकोच्या छळानं TCS मॅनेजरने आयुष्याची दोर कापली,नेमकं काय घडलं?

TCS Manager Manav Sharma Commits Suicide : आग्रा येथे एआय इंजिनिअर अतुल सुभाष यांच्या आत्महत्येसारखंच हे प्रकरण आहे. न्याय हा सर्वांसाठीच सारखा असतो. मात्र अतुल आणि मानव यांच्या प्रकरणात न्याय खरंच झाला का ?
TCS Manger
TCS Manager Manav Sharma Commits Suicide
Published On

धक्कादायक बातमी मुंबईतील टीसीएस कंपनीत काम करणाऱ्या मॅनेजरची. पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. मृत्यूच्या आधी त्याने गळ्यात दोरीचा फास अडकवत लाईव्ह व्हिडिओ केला, ज्यामध्ये त्याने पत्नीकडून होणाऱ्या छळाची माहिती दिली अन् आयुष्य संपवलं पाहूया.

'पुरुषांचा विचार करा, ते खूप एकाकी आहेत. असं म्हणत मुळचा उत्तर प्रदेशातील आग्र्याचा असणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यानं पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलीये. मानव शर्मा असं या तरुणाचं नाव आहे. मृत्यूच्या आधी त्याने गळ्यात दोरीचा फास अडकवत लाईव्ह व्हिडिओ केला, ज्यामध्ये त्याने पत्नीकडून होणाऱ्या छळाची माहिती दिली अन् आयुष्य संपवलं. टीसीएसमध्ये रिक्रूटमेंट मॅनेजर असलेल्या मानवनं पत्नीच्या त्रासाला कंटाळून ६ मिनिटं ५६ सेकंदाचा लाईव्ह व्हिडिओ करत आत्महत्या केली. त्यानं व्हिडिओत काय म्हटलंय पाहूया.

TCS Manger
Akola News: बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; वर्गमित्रासह पोलीस अधिकाऱ्याच्या त्रासामुळं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप

मानव यांच्या कुटुंबाने आग्रा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, महाशिवरात्रीच्या ड्युटीमुळे पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप कुटुंबाने केला. यानंतर त्यांनी थेट उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवर तक्रार केली, आणि अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दुसरीकडे पत्नीने आरोप फेटाळत, तिनं मानवलाच जबाबदार ठरवलं असून तो मानसिक रुग्ण असल्याचं म्हणत स्वतःचा बचाव केलायं.

TCS Manger
Nashik News: शेअर मार्केट कोसळलं, १५ लाख बुडाले; तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

आग्रा येथे एआय इंजिनिअर अतुल सुभाष यांच्या आत्महत्येसारखंच हे प्रकरण आहे. न्याय हा सर्वांसाठीच सारखा असतो. मात्र अतुल आणि मानव यांच्या प्रकरणात न्याय खरंच झाला का ? पुरुषांना होणाऱ्या मानसिक त्रासाबद्दल उघडपणे बोलण्यासाठी न लाजता पुरुषांनीच पुढं येणं गरजेचं आहे. मर्द को दर्द नहीं होता यापेक्षा मर्द को भी दर्द होता है याचा विचार करुन पुरुषी मानसिकतेतून बाहेर पडून यासगळ्याचा विचार करणं गरजेचंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com