Political News: 'पाटलांनी सगळ्याच पक्षाला डोळा मारू नये', अजित पवार गटाच्या नेत्याचा जयंत पाटलांना टोला

Jayant Patils Possible BJP Entry: आमदार जयंत पाटील हे भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चांवर अजित पवार गटातील नेत्यानं प्रतिक्रिया देत टोला लगावला आहे.
Jayant Patil
Jayant PatilSaam Tv News
Published On

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चांवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत टोला लगावला आहे. 'अलीकडच्या काळात पाटील सर्वांनाच डोळे मारत आहेत‌. त्यांनी डोळे मारणे आता बंद करावे', असा टोला त्यांनी लगावला आहे.

आमदार जयंत पाटील हे भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चेला २ कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची घेतलेली भेट आणि दुसरं कारण म्हणजे सांगलीतील त्यांच्या शैक्षणिक संस्थेत झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची हजेरी. या कारणांमुळे जयंत पाटील भाजपात पक्षप्रवेश करतील, अशी चर्चा आहे. याच चर्चांवर अजित पवार गटातील नेते सूरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत टोला लगावला आहे.

Jayant Patil
Pune Crime News: दुचाकी दुरूस्तीवरून वाद, गावगुंडांना बोलावून मॅनेजरला जबर मारहाण; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

'जयंत पाटील यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी सर्वच जण इच्छुक आहेत. त्यांनी ठरवायचे आहे, कुणाकडे जायचे आणि कुणाकडे नाही. परंतु, ते अलीकडच्या काळात सर्वांनाच डोळे मारत आहेत‌. त्यांनी डोळे मारणे आता बंद करावे. एकालाच कुणाला तरी निवडावे', असा टोला चव्हाण यांनी लगावला.

तसेच सूरज चव्हाण यांनी उत्तम जानकरांवर टीका केली आहे. 'माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील आमदार उत्तम जानकर यांनी आपली आमदारकी वाचवण्यासाठी ईव्हीएमचे अस्त्र उचलले आहे. त्यांच्याकडे जातीचा खोटा दाखला आहे. त्यामुळे आपली आमदारकी वाचवण्यासाठी त्यांची ही धडपड सुरू आहे', अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.

Jayant Patil
Chanakya Niti: 'या' ८ गोष्टी कुणालाच सांगू नका, मगच व्हाल धनवान

'आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्के युवकांना संधी देण्याचं धोरण ठरलं आहे.‌ सोलापूर जिल्ह्याला देखील लवकरच जिल्हाध्यक्ष दिला जाणार आहे‌. अनेक जण पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत. लवकरच काही बड्या लोकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झालेले दिसतील', असे संकेत चव्हाण यांनी दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com