Bhagyashree Kamble
यश मिळवण्यासाठी आपण कठोर परिश्रम घेतो. पण काही गोष्टी लपवून ठेवणंही गरजेचं आहे.
आचार्य चाणक्य यांच्या मते, काही गोष्टी इतरांसोबत शेअर केल्यानं आपल्या यशात अडथळे येऊ शकतात.
अशा काही गोष्टी आहेत, जे घरातील सदस्यांनाही सांगू नये.
जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही. तोपर्यंत आपल्या ध्येयाबद्दल कुणाला सांगू नये. कुटुंब किंवा इतर लोक तुमच्या विचारांवर प्रभाव टाकू शकतात.
उत्पन्न किंवा मालमत्ताबाबत कुणालाही याची माहिती देऊ नये. लोक आर्थिक बाबींमध्ये ढवळाढवळ करू शकतात.
मोठ्या योजनेवर काम करत असाल तर, याची माहिती कुणालाही देऊ नये.
दुसऱ्यांचा सल्ला किंवा नकारात्मक विचारांमुळे आपण तयार केलेली प्लॅनिंग बिघडू शकते.
प्रत्येकामध्ये कमजोरी असतात. त्या कमजोरी कोणालाही सांगू नये. लोक याचा फायदा घेऊ शकतात.
कौटुंबिक समस्या लोकांना शेअर करू नका. यामुळे कौटुंबिक संबंध आणखी बिघडते.
वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवा. यामुळे नात्यात दुरावा येतो. तसेच बाहेरचे लोक हस्तक्षेप घेतात.
दानधर्माबाबत चर्चा करू नका. गुप्तपणे केलेलं दान श्रेष्ठ मानलं जातं.