Pune Crime News: दुचाकी दुरूस्तीवरून वाद, गावगुंडांना बोलावून मॅनेजरला जबर मारहाण; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Manager Brutally Beaten by Goons: एका शोरूममध्ये मॅनेजरला गाव गुंडांनी लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. ही धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरातील एका शोरूममध्ये घडली आहे.
CCTV
CCTVSaam Tv News
Published On

एका शोरूममध्ये मॅनेजरला गाव गुंडांनी लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. ही धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरातील केएसबी चौक येथील शिव सुझुकी शोरूममध्ये घडली आहे.

या शोरूमच्या मॅनेजरलाच मारहाण केल्याची बाब समोर आली आहे. मारहाण करतानाचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या प्रकरणी २ अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील केएसबी चौक येथील शिव सुझुकी शोरूमच्या मॅनेजरला गाव गुंडांनी लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. गावगुंड शोरूमच्या मॅनेजरला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करत असल्याची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. शोरूममध्ये दुचाकी दुरुस्तीसाठी दिलेल्या वादानंतर हा मारहाणीचा प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे.

CCTV
Beed Case: वाल्मिक कराडला VVIP ट्रिटमेंट, देशमुख कुटुंबाने मागविले CCTV फुटेज

प्रशांत घाडगे असे ग्राहकाचे नाव आहे. या ग्राहकाने शिव सुझुकी शोरूममध्ये दुचाकी दुरुस्त करण्यासाठी दिली होती. मात्र, दुचाकी योग्यरित्या दुरूस्त करून न दिल्यामुळे ग्राहकाने मॅनेजरसोबत वाद घातला. वादाचं रूपांतर भांडणात झालं. नंतर रागाच्या भरात त्यानं दोन गावगुंड साथीदार बोलावून घेतले आणि मॅनेजर शेखर भरत जाधव याला लाथा बुक्क्यनी बेदम मारहाण केली.

CCTV
Chanakya Niti: 'या' ८ गोष्टी कुणालाच सांगू नका, मगच व्हाल धनवान

'तुम्ही माझी दुचाकी व्यवस्थित दुरुस्त केली नाही, त्यामुळे मी बिल भरणार नाही'. असं धमकावत प्रशांत घाडगे या ग्राहकाने शोरूमच्या मॅनेजरला आपल्या दोन गावगुंड साथीदारांच्या मदतीने बेदम मारहाण आणि शिवीगाळ केली आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी तपास केला. तसेच प्रशांत घाडगे आणि त्याच्या दोन अज्ञात साथीदार विरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com