Vijay Wadettiwar  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'काँग्रेसच्या बाजूने वातावरण, राज्यात १०० टक्के सत्ताबदल होणार', विजय वडेट्टीवार यांना विश्वास

Maharashtra Politics Latest News: छत्रपती शिवाजी महाराज यांची असल्याचा दावा खोटा असल्याचा आरोप इतिहासकार करत आहेत, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे.

Gangappa Pujari

पराग ढोबळे|ता. १८ जुलै २०२४

लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयातून छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे साताऱ्यात दाखल झाली आहेत. मात्र या वाघनखांवरुन राजकीय वर्तुळात आरोप- प्रत्यारोप सुरूच आहेत. ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांची असल्याचा दावा खोटा असल्याचा आरोप इतिहासकार करत आहेत, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

"वाघनखांच्या संदर्भात जर इतिहासकारांनी म्हटलं आहे त्यात तथ्य असू शकते. त्यावर टिका होणार नाही यासाठी संबंधित मंत्र्यांनी दखल घ्यावी. काही दिवसांसाठी ते वाघ नख दिले आहे. त्यावेळेस जाणकारांचं मत समजून घेतलं पाहिजे. विरोधकचं टीका करत आहे असं नाही इतिहासकार सुद्धा यावर टीका करत आहेत, असे विजय वडेट्टीवार म्हणालेत.

राज्यात सत्ताबदल होणार...

"लोकसभेला सर्वांनाच फटका बसला आहे. विधानसभेसाठी जो तो पक्षात आपल्या पद्धतीने काम करत आहे.सध्या काँग्रेसच्या बाजूने सगळं वातावरण आहे. राज्यात सत्ता परिवर्तन 100% होणार आहे. त्यामुळे या बैठकांना जोर आलेला आहे," असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावसा.

दरम्यान, "खासदार शाहूराजे छत्रपती यांनी हात जोडून जनतेची माफी मागितली हा मोठेपणा आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो. आमचे खासदार पुरोगामी विचाराचे पुरस्कर्ते म्हणून झालेल्या घटनेबद्दल जाहीर माफी मागितली त्यापेक्षा मोठे काहीच असू शकत नाही. संभाजीराजें संदर्भात काय चूक झाली तो तपासाचा भाग आहे. त्यात काय सत्य आहे ते चौकशीत पुढे गेल्यानंतर कारवाई कारवाई करावी," असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रात भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्त

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT