vishal pinjani mr gay india saam tv
महाराष्ट्र

Mr Gay India Vishal Pinjani : नाद खूळा! विशाल पिंजानी ठरला 'मिस्टर गे इंडिया', जागतिक स्पर्धेसाठी निवड

विशालने या यशासाठी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेल्या सर्वांचे आभार मानलेत.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Mr Gay India Competition News : मिस्टर गे इंडिया आणि मिस्ट एलजीबीटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या 'मिस्टर गे इंडिया' या स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोल्हापूरच्या विशाल पिंजानीने (vishal pinjani) बाजी मारली. विशालने या यशासाठी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेल्या सर्वांचे आभार मानलेत. (Maharashtra News)

पुण्यात झालेल्या रंगारंग सोहळ्यात कोल्हापूर आणि परिसरात एलजीबीटीक्युआयए प्लस (lgbtq plus) समुदायासाठी 'अभिमान' या स्वयंसहाय्यता गटाद्वारे कार्य करणाऱ्या विशालला सर्व परीक्षकांनी पहिली पसंती दिली. या अंतिम सोहळ्यात समलिंगी पुरुषांचे सामाजिक - सांस्कृतिक संघर्षाला सामोरे जात आत्मविश्वासपूर्वक घडवलेल्या व्यक्तिमत्त्वाचे मोहक रूप, सहानुभाव, सर्वसमावेशकता याचे अनोखे दर्शन घडले.

समलिंगी पुरुषांसाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेत शारीरिक तंदुरुस्ती ,रुबाबदार व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता, हजरजबाबीपणा यासोबतच एलजीबीटीक्युआयए प्लस समुदायासाठी केलेले सामाजिक कार्य हे निवडीचे निकष ठेवले गेले होते.

या स्पर्धेसाठी भारताच्या विविध प्रांतातून स्पर्धक सहभागी झाले होते, त्यापैकी निवडक स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले.आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आणि सामाजिक कार्याचा प्रभाव पाडत विशाल एकेक फेरी पार करत 'मिस्टर गे इंडिया' या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला.

परीक्षकांचे गुण आणि स्पर्धकाला आयोजकांच्या वेबसाईटद्वारे लोकांनी दिलेली मते विचारात घेऊन अंतिम निकाल दिला गेला. राजपिपळा संस्थानाचे राजपुत्र आणि स्वतः समलिंगी असल्याचं जाहीरपणे मान्य करणारे मानवेंद्र सिंह गोहिल यांच्या हस्ते विशालला मिस्टर गे इंडियाचा किताब प्रदान करण्यात आला.

विशाल 'मिस्टर गे इंडिया' ही स्पर्धा जिंकून आता साऊथ आफ्रिकेतील केपटाऊन येथे होणाऱ्या 'मिस्टर वर्ल्ड गे' या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. विशालने या यशासाठी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेल्या त्याच्या कुटुंबीयांचे तसेच मित्रमंडळी, अभिमानचे सदस्य, जिल्हा एडस् नियंत्रण पथक कोल्हापूर (kolhapur) आणि एलजीबीटीक्युआयए प्लस समुदायातील सर्वांचे आभार मानले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT