Sai Baba Darshan : साईंच्या नगरीत राजकारण करू नका : विखे पाटलांचा थोरातांना सल्ला

विखे पाटील यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केल्यानंतर आंदाेलकांनी उपोषण सोडले.
radhakrishna vikhe patil, balasaheb thorat, sai baba, shirdi
radhakrishna vikhe patil, balasaheb thorat, sai baba, shirdisaam tv
Published On

- सचिन बनसाेडे

Radhakrishna Vikhe Patil News : साईबाबांच्या नगरीत राजकारण करू नका असा सल्ला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काॅंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांना सल्ला दिला आहे. तसेच थोरातांचे मुख्यमंत्र्यांना पत्र म्हणजे फक्त राजकारण असल्याची टिप्पणी विखे-पाटलांनी केली आहे. (Maharashtra News)

radhakrishna vikhe patil, balasaheb thorat, sai baba, shirdi
Crime News : कॉलेजला निघालेल्या विद्यार्थींनीची भरदुपारी गळा चिरून हत्या

साई भक्तांसाठी उभारलेली दर्शनरांग (Shirdi Sai Baba Darshan Queue) तातडीने खुली करा, उद्घाटनाला पंतप्रधानांची (pm narendra modi) वेळ मिळाली नाही तर भक्तांची वर्षानुवर्ष गैरसोय होऊ देणार का? असा सवाल उपस्थित करुन काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांना पत्राद्वारे केला. त्यास विखे-पाटील यांनी थाेरातांनी सर्वचबाबतीत राजकारण करु नये असे म्हटले आहे.

radhakrishna vikhe patil, balasaheb thorat, sai baba, shirdi
Shambhuraj Desai News : पाटण नगरपंचायतीस एक कोटींचा निधी, मंत्री देसाईंनी मुख्याधिका-यांना दिली महिन्याची डेडलाईन

विखे पाटील म्हणाले थोरातांच्या तालुक्यात अन्य प्रश्न आहेत. त्यांच्या तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मला सोडवावा लागला. स्वतःच्या अपयशापासून लोकांचे लक्ष इतरत्र नेण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे.

शिर्डीतील दर्शन रांग आणि शैक्षणिक संकुलाच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्र्यांना विनंती केली आहे. उद्घाटन नाही म्हणून भाविकांची गैरसोय झालेली नाही. उद्घाटनाची तारीख मिळावी यासाठी पुन्हा प्रधानमंत्र्यांना विनंती करणार आहाेत. तारीख लवकर मिळाली नाही तर आधी दर्शन रांग सुरू करू आणि लोकार्पण नंतर करू असेही विखे-पाटील यांनी म्हटलं आहे.

थोरातांचे मुख्यमंत्र्यांना पत्र म्हणजे फक्त राजकारण असून साईबाबांच्या नगरीत राजकारण करू नका असा सल्ला देखील विखे पाटलांनी बाळासाहेब थोरातांना दिला आहे. शिर्डीतील नवीन अद्यावत दर्शनरांग सुरू करण्यासाठी बाळासाहेब थोरातांचे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर विखेंच्या मतदारसंघातील विषयाला हात घातल्याने विखेंकडून थोरातांना प्रतिउत्तर दिले गेले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com