Vegetables Price hike Saam Tv
महाराष्ट्र

Vegetable Rate: अरे बापरे! कांदा ५० तर भेंडी ७० रूपये किलो; पावसाळ्याच्या तोंडावरच भाज्यांचे दर कडाडले, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Vegetable Rate Increase: भाजीपाल्यांचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. तीव्र ऊन आणि पाणीटंचाईचा भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला आहे. भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.

Siddhi Hande

भाजीपाल्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे. भाजीपाला उत्पादनात दिवसेंदिवस घट होत आहे. त्याचाच परिणाम भाजीपाल्याच्या किंमतीवर होत आहे. भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत.

छत्रपती संभाजी नगरमध्ये भाजीपाला उत्पादनाला गेल्या गेल्यात तीव्र ऊन आणि पाणी टंचाईचा जबरदस्त फटका बसला. ऊन्हामुळे भाजीपाला पिवळा पडत होता आणि पाणी नसल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनात घट होत होती. त्यामुळे मार्केटमध्ये सुद्धा आवक कमी झाली आहे. कांदा, बटाटा, टॉमेटोचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

कोथिंबीर, हिरवी मिरली, कारलं, शेवगा यांसारख्या भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. राज्यात टॉमेटो ४५ रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. तर शिमला मिर्ची एक किलो ७२ रुपये, कारलं एक किलो ८० रुपयांनी विकले जात आहे. शेवग्याची किंमत दुप्पट झाली असू एक किलो शेवगा ६० रुपयांना विकला जात आहे. अदरक २१० रुपये प्रति किलो विकले जात आहे. कोथिंबीरीची जुडी जवळपास ३०-४० रुपयांना विकली जात आहे.

कांद्याची किंमत वाढली असून एक किलो कांदा ५० रुपयांना विकला जात आहे. बटाट्यांची किंमत ३४ रुपये तर भेंडी १ किलो ७० रुपये झाली आहे. सर्वच भाज्यांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना भाज्यांसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणाटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाणीटंचाईमुळे शेतजमिनींना योग्य पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. येत्या काळात भाजीपाल्यांचे दरात घट होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: 26 त्र्यंबकेश्वरातील प्रवेश कर कायमस्वरूपी रद्द; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिकमध्ये घोषणा

Kamaltai Gawai : एकजीव आणि सक्षम राष्ट्र निर्माण करायला हवं; कमलताई गवईंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला काय सल्ला दिला?

Nagpur Brain Fever: मेंदूज्वर सदृश्य आजाराचा वाढला धोका, मेंदूज्वराने 10 बालकांचा बळी

IND Vs PAK सामना 'या' हल्ल्यामुळे थांबला, स्टेडियम धुराने भरले; पाहा नेमकं काय घडलं? VIDEO

Crime News: बहीण आणि पत्नीचं भांडण सोडवायला गेला; संतापलेल्या बायकोने नवऱ्याचा प्रायव्हेट पार्ट कापला

SCROLL FOR NEXT