Vegetables Rate Increased In APMC: उष्णता वाढल्यामुळे आवक घटली; भाजीपाला महागला, काय आहेत आजचे दर?

Vegetables Rate In APMC Market: एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये आवक घटल्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. सध्या एपीएमसी मार्केटमध्ये 500 गाड्यांची आवक होत आहे.
Vegetables Rate
Vegetables RateYandex

सिद्धेश म्हात्रे, साम टिव्ही प्रतिनिधी नवी मुंबई

एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये आवक (Vegetables Rate) घटल्यामुळे भाजीपाल्याचे दर वधारले आहेत. यासोबतच उष्णतेची लाट सुरु असल्यामुळे बाजारात आलेला भाजीपाला खराब होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. याचा देखील परिणाम दरावर झालाय. सध्या एपीएमसी मार्केटमध्ये (APMC market) 500 गाड्यांची आवक होत आहे. मागणी जास्त मात्र पुरवठा कमी झाल्याने भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत.

वाटाणा, फरसबी, फ्लॉवर, शेवगा शेंग, घेवडा, काकडी आणि पालक, मेथी, मुळा, कोथिंबीर यांचे दर वधारले आहेत. आणखी काही दिवस दर चढेच राहणार असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत (Vegetables Rate In APMC market) आहेत. त्यामुळे स्वयंपाकघरातील बजेट आता कोलमडलं आहे. या आठवड्यात डाळींचे दर देखील गगनाला भिडले आहेत. त्यासोबतच भाजीपाला देखील महागला आहे.

या आठवड्यात भाजीपाल्याचे (Vegetables) दर काय आहेत, ते आपण जाणून घेऊ या. फरसबी 100 रूपये प्रतिकिलो, घेवडा 40 रूपये प्रतिकिलो, काकडी 20 रूपये प्रतिकिलो, शेवगा शेंग 30 रूपये प्रतिकिलो, (Vegetables Rate Update) वाटाणा 100 रूपये प्रतिकिलो, फ्लोवर 16 रूपये प्रतिकिलो, गवार 35 रूपये प्रतिकिलो, ढोबळी मिरची 35 रूपये प्रतिकिलो, भेंडी 38 रूपये प्रतिकिलो, चवळी 26 रूपये प्रतिकिलो, सुरण 60 रूपये प्रतिकिलो, कोथिंबीर 15 रूपये जुडी, मेथी 15 रूपये जुडी, पालक 10 रूपये जुडी, कांदा पात 18 रूपये जुडी, मुळा 50 रूपये प्रतिकिलो आहे.

Vegetables Rate
Vegetables Price Hike: भाजीपाल्यासह कोथिंबीर तेजीत, बीडकरांचे बजेट काेलमडले

15 दिवसांपूर्वीचे दर काय होते, ते पाहू या. फरसबी 33 रूपये प्रतिकिलो, घेवडा 28 रूपये प्रतिकिलो, काकडी 12 रूपये प्रतिकिलो, शेवगा शेंग 25 रूपये प्रतिकिलो, वाटाणा 65, फ्लोवर 9 रूपये प्रतिकिलो, गवार 40 रूपये (Vegetables Rate Todays) प्रतिकिलो, ढोबळी मिरची 37 रूपये प्रतिकिलो, भेंडी 27 रूपये प्रतिकिलो, चवळी 20 रूपये प्रतिकिलो, सुरण 55 रूपये प्रतिकिलो, कोथिंबीर 15 रूपये जुडी, मेथी 10 रूपये जुडी, पालक 10 रूपये जुडी, कांदा पात 12 रूपये जुडी, मुळा 40 रूपये प्रतिकिलो आहेत.

Vegetables Rate
Summer Heat With Vegetable: उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी ‘या’ भाज्यांचा आहारात करा समावेश...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com