Summer Heat With Vegetable: उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी ‘या’ भाज्यांचा आहारात करा समावेश...

Chetan Bodke

उन्हाळ्यामध्ये पोट थंड ठेवणे आवश्यक

उन्हाळ्यामध्ये अनेकजणांचा गरमीमुळे आहार कमी होतो. उन्हाळ्यात अनेकांना पोटाच्या समस्या जाणवतात. अशा परिस्थितीत पोट थंड ठेवणे आवश्यक आहे.

Dehydration In Summer | Saam Tv

पालेभाज्यांतील जीवनसत्वे

उन्हाळ्यामध्ये पालेभाज्या खाल्ल्याने अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते. पालेभाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने आणि खनिजे फार महत्वाचे असतात.

Vegetable | Canva

बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीचा त्रास

उन्हाळ्यामध्ये अनेकांना बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीचा त्रास होतो. त्यामुळे अनेकजण हलका आहार खातात.

Acidity | Yandex

शेवग्याच्या शेंगा

शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. शेवग्याच्या शेंग्यांमध्ये अँटीबायोटिक, अँटी-बॅक्टेरियल आणि फायबरसारखे अनेक गुणधर्म असतात.

Drumstick Tree | Canva

भेंडी

भेंडी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. भेंडीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, फायबर यांसारखे घटक असतात. भेंडीमुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासोबतच रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासही उपयुक्त आहे.

Lady Fingers | Canva

कारले

कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी, लोह, पोटॅशियम, मँगनीज यांसारखे पोषक घटक आढळतात. कारल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी करते.

Bitter Gourd Benefits | Canva

काकडी

उन्हाळ्यामध्ये अनेकांना डिहायड्रेशनच्या समस्या असतात. शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण मुबलक ठेवायचे असल्यास काकडीचे सेवन करावे. काकडीमध्ये भरपूर पाणी असते.

Cucumber Benefits

तोंडली

तोंडलीमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी1, व्हिटॅमिन-सी, कॅल्शियम असे अनेक घटक आढळतात. शरीरातील रक्त शुद्ध करण्यास आणि त्वचा निरोगी ठेवण्यास तोंडली फायदेशीर आहे.

Coccinia | Saam Tv

दुधीभोपळा

दुधीभोपळ्यामध्ये, अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात. दुधीभोपळा तुम्हाला अनेक गंभीर आजारांपासून वाचवण्यास मदत करते.

Calabash | Saam Tv

Disclaimer

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | yandex

NEXT: संत्र्यासोबत सालीचेही आहेत आरोग्याला असंख्य फायदे, जाणून घ्या

Orange Peel | Yandex