Chetan Bodke
संत्री आंबट-गोड फळ आहे. संत्री खाल्ल्याने त्याचा आरोग्याला फायदा होतो. आरोग्यासाठी संत्रीच नाही तर तिच्या सालीचे देखील आरोग्याला अनेक फायदे आहेत.
संत्र्याप्रमाणे त्याचे सालही आपले अनेक आजारांपासून संरक्षण करते. संत्र्याच्या सालीत जीवनसत्व, फायबर, फोलेट आढळते. संत्र्याच्या सालीचा शरीराला फायदा होतो.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी संत्र्याची साल फायदेशीर आहे. संत्र्यात असलेले काही घटक शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.
संत्र्याच्या सालीमध्ये पुरेशा प्रमाणात जीवनसत्व असल्यामुळे फुफ्फुसांचे आरोग्य राखण्यासाठी मदत करते. तसेच अनेक संसर्गापासून वाचण्यासही मदत करते.
संत्र्याची साल पचनसंस्थेसाठी गुणकारी आहे. ज्यांना अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास त्यांच्यासाठी संत्र्याची साल बहुगुणी ठरु शकते.
संत्र्याच्या सालमध्ये असलेले पेक्टिन पोटात चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करतात. पचनाची समस्या कमी करण्यासाठी संत्र्याच्या सालीचा चहा पिऊ शकता.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी संत्र्याची साल रामबाण आहे. यामध्ये असलेले घटक हे साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. तसेच संत्री देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
संत्रीची साल सुकवून, त्याची पावडर करून मध आणि दूध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. हे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने चेहरा नेहमीच फ्रेश दिसतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.