Beed Politics : लोकसभा निवडणूक संपताच बीडमध्ये बदलाचे वारे? क्षीरसागर काका-पुतण्या एकत्र येणार?

Beed Political News : लोकसभा निवडणूक संपताच बीडमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. पुण्यात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी जयदत्त क्षीरसागर यांची भेट घेतली. यानंतर क्षीरसागर काका-पुतण्या एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
 लोकसभा निवडणूक संपताच बीडमध्ये बदलाचे वारे? क्षीरसागर काका-पुतण्या एकत्र येणार?
Beed Politics Saam tv

बीड : बीडमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांचा विजय झाला. यानंतर बजरंग सोनवणे यांच्या भोवती राजकारण फिरू लागले आहे. काल अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी बजरंग सोनवणे हे अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. मात्र, त्यांनी दावा फेटाळला. त्यानंतर बजरंग सोनवणे यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची पुण्यात भेट घेतली. या भेटीनंतर बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्या एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

लोकसभा निवडणूक संपल्यानंतरही बीडमधील राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. ओबीसी नेते, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची खासदार बजरंग सोनवणे यांनी पुण्यात भेट घेतली. यावेळी बजरंग सोनवणे यांनी जयदत्त क्षीरसागर यांचं स्वागत केलं.

 लोकसभा निवडणूक संपताच बीडमध्ये बदलाचे वारे? क्षीरसागर काका-पुतण्या एकत्र येणार?
Maharashtra Politics 2024 : लोकसभा निकालानंतर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय ठिणग्या; काँग्रेस-शिवसेनेत उडाला पहिला खटका, कारण समोर

पुण्यात बजरंग सोनवणे आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर जयदत्त क्षीरसागर शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामुळे जयदत्त क्षीरसागर आणि संदीप हे दोन्ही काका-पुतणे एकत्र येतील, अशी चर्चा सुरु झाली आहे.

जयदत्त क्षीरसागर विधानसभा निवडणुकीचा शब्द घेऊनच शरद पवार गटाच प्रवेश करू शकतात, असं बोललं जात आहे. जयदत्त क्षीरसागर यांना बीड विधानसभेची उमेदवारी दिली तर आमदार संदीर क्षीरसागर यांचेही काय? या प्रश्नाचीही राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

आमदार संदीप क्षीरसागर यांनाच उमेदवारी दिली, तर जयदत्त क्षीरसागर यांचं काय, असाही पेच निर्माण होतो. त्यामुळे दोघांनीही तोडीसतोड पदे देण्याचं आव्हान पक्षश्रेष्ठींसमोर राहील. तेव्हाच होईल, जेव्हा काका-पुतण्या एकत्र येतील, असे बोलले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com