महेंद्र वानखेडे
वसई : शहर परिसरात घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला (Vasai) माणिकपूरच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून सहा गुन्ह्यांची उकल केली असून ५७ गुन्हे याआधी वेगवेगळ्या (Police) पोलिस ठाण्यात दाखल आहेत.
वसईतील शास्त्रीनगरच्या सिल्व्हर सॅन्ड सोसायटीत राहणाऱ्या माधवराव वाडीकर (वय ५०) यांच्या घरी १५ एप्रिलला दुपारी घरफोडी झाली आहे. चोरट्याने घरातून लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी गुन्हा (Crime News) दाखल केला होता. यानंतर माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी कुठल्याही प्रकारचे सीसीटीव्ही (Vasai Crime) फुटेज उपलब्ध नसताना आजूबाजूच्या सोसायटीचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आरोपीचा मागोवा घेऊन आरोपीचे वर्णन प्राप्त करून आतिष साखरकर (वय ३६) याला वसईतून ताब्यात घेतले.
बोरीवली, विलेपार्ले परिसरातही केले गुन्हे
पोलिसांनी आरोपीची चौकशी केल्यावर त्याने बोरिवली व विलेपार्ले परिसरात अशा प्रकारे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्याने ६ गुन्ह्यांची उकल करून त्याच्याकडून ११ लाख ४४ हजार ५५० रुपयांचे २२८ ग्रॅम सोने, ३ मोबाइल फोन, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १२ लाख २२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.