Kantilal Bhuria: दोन बायका असलेल्या पुरुषांना मिळणार २ लाख रुपये; काँग्रेस नेत्याची अजब ऑफर

Kantilal Bhuria Congress: व्यक्तीला दोन बायका असेल त्यांना २ लाख रुपये देणार, असं आश्वासन काँग्रेसचे उमेदवार कांतीलाल भुरिया यांनी मतदारांना दिलं आहे.
Kantilal Bhuria Congress
Kantilal Bhuria CongressSaam TV

देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी राजकीय नेते ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. त्याचबरोबर उमेदवारांकडून मतदारांना अनेक मोठमोठी आश्वासने देखील दिली जात आहेत. यासाठी काहींनी आपले स्वतंत्र जाहीरनामे देखील प्रसिद्ध केले आहेत. अशातच ज्या व्यक्तीला दोन बायका असेल त्यांना २ लाख रुपये देणार, असं आश्वासन काँग्रेसच्या एका उमेदवाराने दिलं आहे.

Kantilal Bhuria Congress
Shiv Sena vs BJP : नरेंद्र मोदी ४ जूननंतर पंतप्रधान नसतील, ते झोला घेऊन हिमालयात जातील; शिवसेना ठाकरे गटाची टीका

मध्य प्रदेशातील रतलाम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कांतीलाल भुरिया यांनी मतदारांना हे आश्वासन दिलं आहे. माजी केंद्रीय मंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपने आयोगाकडे केली आहे.

कांतीलाल भुरिया यांनी गुरुवारी रतलाम मतदारसंघातील एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जारी केलेल्या न्याय पत्राचा संदर्भ देताना महालक्ष्मी योजनेचा उल्लेख केला. भुरिया म्हणाले, "आमचा जाहीरनामा असा आहे की, प्रत्येक महिलेच्या खात्यात एक लाख रुपये जमा होतील. घरातील सर्व महिलांना प्रत्येकी एक लाख मिळणार आहेत".

मात्र, ज्यांना दोन बायका आहेत, त्यांनाही दोन लाख रुपये मिळतील. असं भुरिया म्हणाले. यावेळी व्यासपीठावर दिग्विजय सिंह आणि जितू पटवारीही उपस्थित होते. पटवारी यांनी देखील भुरिया यांच्या मुद्याचे समर्थन केले. भुरिया यांनी नुकतीच एक अद्भुत घोषणा केली, ज्यांना दोन बायका आहेत त्यांना नक्कीच २ लाख रुपये मिळतील, असं पटवारी म्हणाले.

दरम्यान, कांतीलाल भुरिया यांच्या विधानावर भाजपने जोरदार टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी निवडणूक आयोगाकडे भुरिया यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्विटरवर व्हिडीओ देखील शेअर केला आहे. यामुळे कांतीला भुरिया यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Kantilal Bhuria Congress
Uddhav Thackeray Interview : लोकशाही, आरक्षण, भ्रष्टाचार; लोकसभा निवडणुकीदरम्यान ठाकरे वादळ धडकणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com