Uddhav Thackeray Interview : लोकशाही, आरक्षण, भ्रष्टाचार; लोकसभा निवडणुकीदरम्यान ठाकरे वादळ धडकणार

Uddhav Thackeray Interview with sanjay raut : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याआधीच खासदार संजय राऊत यांनी धामधुमीत उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे.
Uddhav Thackeray Interview
Uddhav Thackeray Interview Saam tv
Published On

मुंबई : लोकसभा निवडणुकीमुळे देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. देशात लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पूर्ण झाला आहे. राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आता देशात चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी सभांचा धडाका लावला आहे. आता निवडणुकीच्या धामधुमीत उद्धव ठाकरे यांचं वादळ धडकणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याआधीच खासदार संजय राऊत यांनी धामधुमीत उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे.

सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा पहिला भाग येत्या रविवारी प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तुफान टीका केली आहे.

Uddhav Thackeray Interview
Pune Rain Update : ऐन उन्हाळ्यात पुण्याला पावसानं झोडपलं; उकाड्याने हैराण झालेल्यांना मिळाला दिलासा

या मुलाखतीत संजय राऊत म्हणाले, नरेंद्र मोदी आणि शहा राज्यात येतात. त्यांच पहिलं टार्गेट उद्धव ठाकरे आणि त्यानंतर शरद पवार'. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देशात लोकशाहीचं वस्त्रहरण होतं असल्याचं म्हटलं. काश्मीरच्या प्रश्नावरून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पुलवाम्याच्या हल्ल्याला जबाबदार कोण? असा सवाल केला.

सध्याच्या निवडणुकीत मोदींकडून मुस्लिम आरक्षण, भ्रष्टाचार असे मुद्द्यांवर बोललं जातंय, असे संजय राऊत म्हणाले. त्यानंतर ठाकरेंनी आमच्या निवडणुकीच्या प्रचारात हिंदुस्तान असल्याचे सांगितले. तर भ्रष्टाचारावरून टीका करताना 'व्हॅक्युम क्लिनर' बोलत मोदींवर टीका केली.

Uddhav Thackeray Interview
Ajit Pawar: 'पवार साहेब असं स्टेटमेंट करतात की डोकं खाजवायला लावतात', अजित पवार पुन्हा बोलले; नेमकं काय म्हणाले?

'भाजप निवडणुकीत राम राम....निवडणुकीनंतर मरा मरा.. सुरु असतं. ते निवडणुकीच्या निकालात सरपटणार आहेत, अशीही टीका ठाकरेंनी केली.

'पंतप्रधान नरेंद्र मोदींना दहा वर्षे महाराष्ट्राचं प्रेम आणि आशीर्वाद मिळालं. आता महाराष्ट्राचा शाप काय असतो हा मोदींनी अनुभवावा, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com