vanchit bahujan aghadi andolan in buldhana
vanchit bahujan aghadi andolan in buldhana saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : शेतक-यांना नुकसान भरपाई कधी मिळणार? 'वंचित'सह ठाकरे गटाचा बुलढाणा प्रशासनास सवाल, आंदाेलनाचा इशारा

संजय जाधव

Buldhana :

ढगफुटी, गारपीट आदी कारणांमुळे बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या शेतीच्या नुकसान भरपाईची रकक्म अद्याप शेतक-यांना मिळाली नसल्याने राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी (vanchit bahujan aghadi) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जिल्हा प्रशासनास तातडीने शेतक-यांना नुकसान भरपाईचे आदेश देण्याची मागणी केली आहे. (Maharashtra News)

वंचित बहुजन आघाडीचा आंदाेलनाचा इशारा

गतवर्षी जुलै महिन्यात जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता. या दोन तालुक्यातील शेकडो गावे वाहून गेली होती शेती व घरे वाहून गेल्याची नोंद सरकार दफ्तरी करण्यात आली होती.

अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही

पंचनामे होऊन वर्ष होत आले तरी अद्याप एकालाही नुकसान भरपाई मिळाली नाही. वारंवार शासनास निवेदने देऊन थकलाे असे शेतक-यांनी नमूद केले. आता 5 मार्चपर्यंत नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई द्या, आर्थिक मदत करा अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करु असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे बुलढाणा जिल्हा प्रशासनास देण्यात आला आहे.

ठाकरे गटाचा इशारा

खरीप आधीच हातचा गेलेला असताना रब्बी हंगामातील उत्पादनावर शेतकऱ्यांना मोठ्या आशा होत्या. मात्र जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने मायबाप शेतकरी अडचणीत सापडला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण होऊन शेतकऱ्यांना थेट खात्यात आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. या नुकसानीचा तात्काळ सर्व्हे करून शेतक-यांना आर्थिक मदत देण्यात यावी. अन्यथा जिल्हा शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Live News Updates : धारावी पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे गटाच आंदोलन

Maratha Reservation: मोठी घोषणा! लवकरच सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढणार!

Sage Soyare Ordinance: मोठी बातमी! राज्य सरकार लवकरच सगेसोयऱ्याचा अध्यादेश काढणार, चंद्रकात पाटील यांची माहिती

Mahadev Jankar Video: महादेव जानकरांची मोठी घोषणा; पुढची लोकसभा बारामतीतून लढणार!

Vitthal Maharaj Shastri Prediction : देवेंद्र फडणवीस होणार पुन्हा मुख्यमंत्री! विठ्ठल महाराज शास्त्री यांची मोठी भविष्याणी

SCROLL FOR NEXT