Vadapav Price Saam Tv
महाराष्ट्र

Vadapav Price: मुंबईचा वडापाव महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार

Vadapav Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. वडापावच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. पावाच्या किंमती वाढणार असल्याने वडापावच्या किंमतीत २-३ रुपयांनी वाढ होणार आहे.

Siddhi Hande

सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या २४ डिसेंबरपासून वडापाव महाग होणार आहे. मुंबईत आल्यावर कोणीही उपाशीपोटी झोपत नाही. याचे कारण म्हणजे वडापाव. अनेक लोक वडापाव खाऊन आपला दिवस काढतात. परंतु आता हा वडापाव महाग होणार असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. (Vadapav price Hike)

२४ डिसेंबरपासून पावाचे भाव वाढण्याचा निर्णय बदलापूर बेकरी असोसिएशन घेतला आहे.तेल कांद्यापाठेपाठ आता पावही महागले आहेत. त्यामुळे वडापाव १ ते २ रुपयांनी महाग होऊ शकतो, अशी माहिती वडापाव विक्रेत्यांनी दिली आहे.

बदलापुरमध्ये पावाच्या एका लादीमागे ३ रुपयांनी दरवाढ करण्यात आली आहे. कुळगाव-बदलापूर बेकरी असोसिएशनतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधीच तेल, कांदा आणि बटाटा महाग झाला आहे. त्याचसोबत किराणामालाचे भाव वाढत आहेत. त्यामुळे पूर्वीच्या दरात वडापाव विकणे परवडत नाही. या कारणाने आम्हाला वडापावच्या दरात १ ते २ रुपयांनी वाढ करावी लागू शकते, असं वडापाव विक्रेत्यांचं म्हणणं आहे. सध्या वडापावसाठी १५ रुपये मोजावे लागत आहेत. तर येत्या काळात एका वडापावसाठी १६ ते १७ रुपये मोजावे लागू शकतात. (Vadapav Price Increases)

सध्या बाजारात कांदे ७५-८३ रुपये प्रति किलोवर विकले जात आहे. कांद्याच्या किंमती वाढल्याने नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहेत. त्यातच आता वडापावच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना अजूनच त्रास सहन करावा लागणार आहे. अशातच तेलाच्या किंमतीही वाढत आहेत. त्यामुळे वडापाव महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT