Siddhi Hande
मुंबईचा वडापाव हा जगभरात प्रसिद्ध आहे.
मुंबईचा स्ट्रीट स्टाईल वडापाव बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे उकडून घ्या.
बटाटे उकडल्यानंतर त्याची साल काढून मस्त मॅश करुन घ्या.
त्यानंतर एका कढईत तेल टाका. त्यात जिरे मोहरी, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट याची फोडणी द्या.
त्यानंतर त्यात हिंग, हळद, मीठ टाकून परतून घ्या. त्यात मॅश केलेले बटाटे आणि कोथिंबीर टाका.
यानंतर दुसऱ्या पातेल्यात बेसन पीठ घ्या. त्यात थोडासा ओवा टाका.
या मिश्रणात पाणी टाका. त्यानंतर दुसरीकडे वडे बनवून घ्या.
वडे पीठात बुडवून मस्त गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या.