Siddhi Hande
कांदा भजी हे सर्वांनाच खूप आवडतात. संध्याकाळी नाश्त्याला कुरकुरीत भजी खाणे हे सुख असते.
कांदा भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम कांदा उभा बारीक कापून घ्यावा.
यानंतर एका भांड्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, लाल तिखट, ओवा टाकावा.
यानंतर त्यात बेसन पीठ टाकावे. या मिश्रणात चवीनुसार मीठ टाकावे.
यानंतर पीठात पाणी टाकून मस्त मिक्स करावे. परंतु पाणी न टाकता तुम्ही भजी काढले तरी ते खूप चांगले लागतात.
यानंतर या मिश्रणात कांदा टाकावा. एका बाजूला कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा.
तेल गरम झाल्यावर त्यात भजी सोडा.गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या.
Next: घरच्या घरी नाश्त्याला बनवा झणझणीत मिसळ, रेसिपी वाचा