Siddhi Hande
मिसळ हा पदार्थ हा सर्वांनाच आवडतो. झणझणीत मिसळ आणि त्यावर फरसाण टाकून खाण्याच मज्जा काही वेगळीच असते.
मिसळ बनवण्यासाठी सर्वप्रथम मटकी स्वच्छ धुवून घ्या. त्यात थोडं मीठ, हळद आणि पाणी टाका.
मटकी तुम्ही कुकरध्ये शिजवून घ्या. त्यानंतर मिसळीचा मसाला बनवा.
मिसळ मसाला बनवण्यासाठी तेल गरम करा. त्यात कांदा, आलं लसूण, खोबरे, टॉमेटो टाका. यानंतर परतून झाल्यावर हे सर्व चांगलं बारीक करुन घ्या.
यानंतर कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता टाका.
त्यानंतर हळद, धना पावडर, गरम मसाला टाकून परतून घ्या. यानंतर त्यात मिसळ मसाला टाका.
यातून तेल वेगळे होईपर्यंत मस्त शिजवून घ्या. यानंतर मिसळीवर फरसाण, कांदा कोथिंबीर टाकून खाऊ शकता.