Siddhi Hande
पावभाजी हा पदार्थ सर्वांनाच खूप आवडतो. लहान मुले तर खूप आनंदाने खातात.
पावभाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे, टॉमेटो, शिमला मिरची या भाज्या शिजवून घ्या.
कुकरमध्ये २-३ शिट्ट्यांमध्ये भाज्या मस्त शिजतील.
त्यानंतर या भाज्या तुम्ही मॅश करुन घ्या. मिक्समध्येही तुम्ही भाज्या बारीक करु शकतात.
यानंतर कढईत तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट आणि पावभाजी मसाला टाका.
हे मिश्रण चांगले परतून घ्या. त्यानंतर थोडे पाणी टाका.
यानंतर यात मॅश केलेल्या भाज्या टाका. थोडा वेळ भाजी शिजवून घ्या.
यानंतर तुम्ही पावभाजी खाऊ शकतात.