Nahik Water Supply yandex
महाराष्ट्र

Nashik Water Cut: नाशिककरांनो, पाणी जपून वापरा; दोन दिवस शहरात पाणीबाणी

Nashik Water Cut on Saturday 30th November: नाशिक शहरात येत्या शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना दोन दिवस पाण्याचे नियोजन करून वापरावे लागणार आहे.

Dhanshri Shintre

नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरात विविध जलशुद्धीकेंद्रांवर कामे हाती घेतल्याने शनिवारी ३० नोव्हेंबर रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाने दिले आहे.

येत्या शनिवारी नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर रविवारदेखील कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दोन दिवस नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे नाशिक मनपा प्रशासनाचे आवाहन आहे.

नाशिक स्मार्ट सिटी कंपनी व मनपा पाणीपुरवठा वितरण विभागामार्फत मनपाचे विविध जलशुध्दीकरण केंद्रे, विविध बुस्टर पंपींग स्टेशन येथे विविध ESR येथे फ्लोमीटर्स, व्हॉल्व्स बसविणे इ. कामे करणेचे खालीलप्रमाणे नियोजन करण्यात आलेले आहे.

1. पंचवटी जलशुद्धीकरण केंद्रः एच टी पोल शिफ्ट करणे.

2. गांधी नगर जलशुद्धीकरण केंद्र: फ्लोमीटर बसविणे.

3. नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्र: विविध ठिकाणी फ्लोमीटर, व्हॉल्व बसविणे.

4. शिवाजी नगर जलशुद्धीकरण केंद्र: विविध ठिकाणी फ्लोमीटर बसविणे.

5. बूस्टर पंपिंग स्टेशनः विविध ठिकाणी फ्लोमीटर बसविणे.

6. सातपूर विभागातील ९०० मि.मी. फीडर पाइपलाइनवरील जलकुंभावर व्हॉल्व व वॉटर मीटर बसविणे.

7. सातपूर प्रभाग क्र. ०९ मधील कार्बन नाका संदीप प्लास्टीक वॉल कंपाऊंडलगत शुध्द पाण्याच्या ५०० मि.मी. पीएससी पाइपलाइन वरील पाणी गळती बंद करणे.

8. प्रभाग क्र. १० मधील भारत गॅस एजन्सीसमोर अशोक नगर येथे ९०० मि.मी. DI पाइपलाइनवरील पाणी गळती बंद करणे.

9. गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक येथील रॉ वॉटर पाइपलाइन पाणी गळती बंद करणे व पाथर्डी फाटा येथील ६०० मि.मी. व्हॉल्व दुरुस्ती करणे.

10. कशिश हॉटेलजवळील ७०० मि.मी. पाइपलाइनवरील व्हॉल्व लिकेज बंद करणे तसेच हॉटेल रेडिसन ब्लू येथील आनंद नगर टाकीच्या पाइपलाइनवरील पाणी गळती बंद करणे.

11. स्मार्ट सिटी कंपनी मार्फत वासन नगर ESR, राणीनगर ESR, पाथर्डी फाटा GSR येथील पाइपलाइनवर व्हॉल्व बसविणे व इतर अनुषंगिक कामे करणे.

12. नाशिकरोड विभागातील उपनगर इच्छामणी मंगल कार्यालयाजवळ संजय गांधी नगर रॉ वॉटर पाइपलाइन लिकेज बंद करणे.

13. पवारवाडी जलकुंभ भरणारी उर्ध्ववाहिनी जेलरोड सिग्नलजवळ लिकेज बंद करणे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT