Maharashtra Weather Update Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: राज्यावर अवकाळीचे संकट कायम, कोकणात उष्णता वाढणार; आज कुठे कसं हवामान?

IMD Alert For Konkan: राज्यात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. आजही राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. तर कोकणात उष्णतेत वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात आज कुठे कसं हवामान असेल वाचा सविस्तर...

Priya More

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. आठवडाभरापासून राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस अन् गारपीट झाली. यामुळे अनेक जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान झाले. आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक असे वातावरण आहे. असे असले तरी दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये उष्णता वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने काही जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात आज उष्णतेचा चटका वाढण्याची शक्यता आहे. तर उर्वरीत राज्यामध्ये ढगाळ हवामानासह कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

आज कोकणात उष्ण आणि दमट वातावरण राहिल. उन्हाच्या झळ्या तीव्र असतील. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आज पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात आज काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहिल. उष्णता वाढणार असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले. त्याचसोबत जीवितहानी आणि वित्तहानी देखील मोठ्या प्रमाणात झाली. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळीचा फटका बसला. कांदा, गहू, फळ भाज्या, द्राक्ष बागा, आंबा यांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे बळीराजा चिंतेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT