Shiv Sainiks staging a protest outside a party branch office in Ulhasnagar against the Shinde faction leadership. Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिंदे गटात अंतर्गत वाद उफाळला; उल्हासनगरमधील 200 हून अधिक पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या तयारीत

Ulhasnagar Shiv Sena Crisis: उल्हासनगरमधील शिंदे गटात अंतर्गत वाद उफाळून आलाय. जवळपास २०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते निवडणुकीपूर्वी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी करत राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.

Bharat Jadhav

  • उल्हासनगरमध्ये शिंदे गटात अंतर्गत नाराजी उफाळली

  • 200 हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते राजीनाम्याच्या तयारीत

  • स्थानिक उमेदवारांना संधी द्या अशी कार्यकर्त्यांची मागणी

अजय दुधाणे, साम प्रतिनिधी

उल्हासनगरमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटातील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे. पक्षाचे 200 हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते जाहीर राजीनामे देण्याच्या तयारीत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिवसैनिकांनी शाखेसमोर जोरदार निदर्शने करत “स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्या, उमेदवार आयात करू नका” या मागणीसाठी आंदोलन केले. यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली.

गेल्या निवडणुकीत या प्रभागातून आयात केलेल्या उमेदवाराला तिकीट देऊन नगरसेवक बनवल्याचा आरोप शिवसैनिक करत आहेत .मात्र त्यांच्या संपूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळात ते ना प्रभागात दिसले, ना नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष दिले. स्थानिक कार्यकर्त्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले, त्यामुळे पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणुकीत स्थानिक आणि कष्टाळू शिवसैनिकांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी आता शिवसैनिकांनी केली आहे. वरिष्ठ नेतृत्वाने ही मागणी मान्य न केल्यास या प्रभागातील सर्व 200 च्या वर पदाधिकारी एकत्र राजीनामा देतील असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या घडामोडींमुळे उल्हासनगरमधील शिवसेना शिंदे गटासाठी मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे.आता या नाराजीवर पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'भाजपचा वॉच, नगरसेवकांचे फोन टॅप'; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

Maval Politics: फॉर्म भरण्याच्या दिवशीच मावळात हाय व्होल्टेज ड्रामा; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भाजप शिंदेसेनेविरोधात पोलिसात जाणार, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Fact check: कर्ज देणारा करोडपती भिकारी...; व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Maharashtra Politics: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार का? अजित पवारांच्या गटातील बड्या नेत्याचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT