Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरमध्येही महायुती तुटली; अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर

Ajit Pawar Faction Releases First Candidate List: अजित पवार गटाने छत्रपती संभाजीनगरमधील १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. स्वतंत्रपणे महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादीनं घेतलाय.
Ajit Pawar Faction Releases First Candidate List:
Ajit Pawar faction leaders releasing the first list of candidates for Chhatrapati Sambhajinagar civic elections.saam tv
Published On
Summary
  • अजित पवार गट राष्ट्रवादी स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात

  • पहिल्या यादीत १८ उमेदवारांची घोषणा

  • मुस्लिम मतदारबहुल भागाच्या प्रस्तावावरून महायुतीतून बाहेर

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या अजित पवार गटाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. घराणेशाहीच्या विरोधात आमच्या पक्षाचे १०० उमेदवार निवडणुकीत स्वबळावर लढणार अशी घोषणा शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांनी काही दिवसापूर्वी केली होती. आता अजित पवार गट राष्ट्रवादीनं एक पाऊल पुढे जात आपल्या पहिल्या १८ उमेदवारांची यादी जाहीर केलीय.

Ajit Pawar Faction Releases First Candidate List:
Jalgaon Politics: ज्यांचे तिकीट कापले जाईल, त्यांना आमदारकी; नाराज इच्छुकांसाठी भाजपची नवी ऑफर

मुस्लीम मतदारबहुल भागात राष्ट्रवादीने उमेदवार द्यावेत, असा प्रस्ताव भाजपकडून ठेवण्यात आला होता. परंतु राष्ट्रवादीला त्यात काहीही तथ्य वाटले नाही. तेथेच महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला होता. आज अजित पवार गटाने १८ प्रभागातील उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी यादी जाहीर केलीय. राष्ट्रवादीला युतीमध्ये घेण्याबाबत गेल्या आठवड्यात भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे व देशमुख यांच्या एकमेव बैठक झाली आहे.

Ajit Pawar Faction Releases First Candidate List:
Solapur Politics: सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारानेच पक्षाला ठोकला रामराम

त्यानंतर दोन्ही पक्षांकडून एकमेकांना काही अपडेट मिळाली नाही. दरम्यान मुस्लीम मतदारबहुल भागात राष्ट्रवादीने उमेदवार द्यावेत, असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

भाजपकडे राष्ट्रवादीने मागितल्या होत्या ३५ जागा

भाजप आणि अजित पवार गट महापालिका निवडणुकीत महायुतीच्या अनुषंगाने १८ डिसेंबरला पहिली आणि शेवटची बैठक झाली. राष्ट्रवादीने ३५ जागा वाटाघाटीतून ३ मिळाव्यात, असा प्रस्ताव भाजपसमोर ठेवण्यात आला. यात मुस्लीमबहुल भागातील २५, इतर प्रभागातील १० जागांचा समावेश होता. आमची तयारी पूर्णत्यांची युती कधी होते, यावर आमचे लक्ष आहे. युती झाली की, आम्ही १०० जागांवर उमेदवार देणार असल्याचं अभिजित देशमुख म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com