Ulhasnagar News Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar News : पहाटेपर्यंत चालणारी छमछम होणार बंद; उल्हासनगरमधील अनधिकृत डान्सबारवर बुलडोझर

अजय दुधाणे

अंबरनाथ : उल्हासनगरमधील अनधिकृत डान्सबारवर महापालिकेने कारवाई करण्यास सुरवात केली आहे. यात श्रीराम चौकातील ऍपल आणि एंजल या दोन डान्सबारवर महापालिकेकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. यामुळे परिसरात पहाटेपर्यंत डान्सबारवर सुरु राहणारी छमछम आता बंद होणार आहे. या कारवाईमुळे उल्हासनगरातील अनधिकृत डान्सबार आणि पब चालकांचे धाबे दणाणले आहे.  

उल्हासनगर शहरात अनेक डान्सबार असून पहाटेपर्यंत या डान्सबारमध्ये छमछम सुरू असते. या डान्सबारवर अनेकदा कारवाया होऊन देखील हे डान्सबार सर्रासपणे सुरू असल्याचे पाहायला मिळत होतं. पुण्यातील ड्रग्स प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी पुण्यासह संपूर्ण राज्यातील अनधिकृत बार आणि पबवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याच आदेशानंतर उल्हासनगर महापालिकेने उल्हासनगर शहरातील सर्व बारची (Dance Bar) कागदपत्रांची तपासणी करत कारवाई सुरवात केली आहे. 

महापालिकेने कागदपत्र तपासणी करत आणि परवानगी यांची पडताळणी केली. त्यात अनधिकृत आढळून आलेल्या श्रीराम चौकातील ऍपल आणि एंजल या दोन डान्सबारवर धडक कारवाई सुरू करण्यात आली. उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर गवस आणि सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई सुरू केली. शहरातील इतरही बारची कागदपत्रे मागवली असून त्यात जे बार अनधिकृत आढळतील त्यांच्यावर धडक कारवाई केली जाईल; अशी माहिती उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : आज धाडसाने अनेक गोष्टी कराल, नको ती जबाबदारी अंगावर येऊन पडणार; वाचा आजचे राशीभविष्य

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

MIM महाविकास आघाडीत सहभागी होणार? कोणत्या भागातून मागितल्या जागा? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा; काँग्रेस आमदारांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT