Thunder saam
महाराष्ट्र

Jalgaon : शेतात राबताना बळीराजावर वीज कोसळली, २ शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू

Lightning Strikes Kill Two Farmers: जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि पाचोरा तालुक्यात वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू. शेती करत असताना अंगावर वीज कोसळली. गावात शोककळा पसरली आहे.

Bhagyashree Kamble

शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसात अंगावर वीज कोसळल्यामुळे दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि पाचोरा तालुक्यात घडली आहे. दोन्ही गावात जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाट सुरू झाला. काही क्षणातच वीज कोसळली. वीज कोसळल्यानंतर दोन्ही शेतकऱ्यांचा शेतातच मृत्यू झाला. या दु:खद घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.

पहिली घटना मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड गावात घडली. शांताराम शंकर कठोरे असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे. कठोरे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करीत होते. वातावरण ढगाळ असले, तरी नियमित काम सुरू होते. अचानक जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला आणि काही क्षणातच त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यात कठोरे यांचा जागीच मृत्यू झाला.

तर, दुसऱ्या घटनेत मोहित जगतसिंग पाटील यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. २५ वर्षीय तरूण शेतकरी हे शेतात मका लागवड करीत होते. मोहित पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदी या गावातील रहिवासी होते. शेतात मका लागवड करीत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली.

अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे गावात शोककळा पसरली आहे. या दोन्ही घटनेनंतर मुक्ताईनगर आणि पाचोरा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोल्हार-घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात

संगमनेर तालुक्यातील कोकणगाव शिवारात पहाटेच्या सुमारास कोल्हार-घोटी राज्यमार्गावर एक भीषण अपघात घडला. शिर्डीकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल्स बस आणि आंबे घेऊन जाणाऱ्या ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. जखमींना जवळच्या रूग्णालयात हलवण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT