Manasvi Choudhary
आजकाल लठ्ठपणा ही आरोग्यासाठी गंभीर समस्या बनली आहे. वजन वाढले की ते कमी करण्यासाठी आहारपद्धतीत बदल करणे महत्वाचे आहे.
रोजच्या रोज केवळ व्यायाम करूही फायदा होत नसेल तर तुम्ही आहारांमध्ये देखील बदल करणे महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये विविध पदार्थांचा समावेश करतात.
ओट्स, डालिया अनेकजण खातात पण वजन कमी कऱण्यासाठी नेमका कोणता पदार्थ अधिक फायदेशीर आहे ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
ओट्समध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. ओट्समधील बीट ग्लुकन शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि शरीराची पचनक्रिया सुधारवते.
नाश्त्याला तुम्ही ओट्स खाल्ल्याने सकाळी भूक लवकर लागत नाही. पोट बराच वेळ भरलेले राहते.
दालियामध्ये आयर्न, मॅग्नेशियम, फॉलेट हे पौष्टिक घटक असतात. वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये दालिया खाणे फायद्याचे आहे.
दालिया हे पोषणतत्वांनी परिपूर्ण आहे. लापशी पचायला हलकी असते. वजन कमी करण्यासाठी बद्धकोष्ठतेसारख्या समस्या अनेकांना निर्माण होतात त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
दालिया खाल्ल्याने शरीराचे मेटाबॉलिजम वाढते यामुळे वजन नियंत्रित करणारे हार्मोन्सही सक्रिया अतात त्यामुळे शरीराला फायदा होतो.
जर तुम्हाला झटपट वजन कमी करायचे असेल तर तुम्ही नाश्त्याला ओट्स खाणे महत्वाचे ठरेल.
जर तुम्हाला पौष्टिक नाश्ता करायचा असेल तर दालिया खाण्याचे फायदेशीर ठरेल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.