Manasvi Choudhary
लांब आणि घनदाट केसांसाठी केवळ तेल आणि शॅम्पू महत्वाचे नाही तर आहारात तुम्ही काय खाता हे देखील महत्वाचे
सकाळची सुरूवात हेल्दी ड्रिंक्सने केल्यास केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केसांची वाढ झपाट्याने होण्यास मदत होते.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केस वेगाने वाढतात. सकाळी रिकाम्यापोटी तुम्ही या ड्रिंकचे सेवन करा.
ग्रीन टीमधील अँटिऑक्सिडंट्स केसांच्या टाळूवरील घाण स्वच्छ करते यामुळे केसांत कोंडा होत नाही आणि केस गळतीचे प्रमाण देखील कमी होते.
बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि बायोटिन असते, जे केसांच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचे मानले जाते. रात्री झोपण्यापूर्वी ४-५ बदाम पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या.
कोथिंबीरमध्ये लोह , फॉलिक एसिड आणि व्हिटॅमिन ए, सी आणि ई असते. हे पेय शरीराला डिटॉक्स करते आणि केस गळती आणि केस पांढरे होण्यापासून रोखते.
लिंबूमधील व्हिटॅमिन सी शरीरासाठी फायदेशीर आहे. सकाळी पाण्यात लिंबू मिक्स करून ते पाणी रिकाम्या पोटी प्या.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.