Real Estate :मुंबईच्या मालमत्ता बाजाराची भरारी! जुलैत 14 वर्षांतील विक्रमी नोंदणी; मुद्रांक शुल्कातून 1,223 कोटींचा महसूल

Homes in Mumbai : मुंबईत जुलै 2026 मध्ये 13,617 मालमत्तांची नोंदणी होत गेल्या 14 वर्षांतील जुलै महिन्याचा विक्रम नोंदवला गेला.मुद्रांक शुल्कातून राज्य सरकारला तब्बल 1,223 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील वाढती मागणी आणि प्रीमियम घरांची पसंती यामुळे बाजाराला आणखी बळ मिळत आहे.
Real Estate :मुंबईच्या मालमत्ता बाजाराची भरारी! जुलैत 14 वर्षांतील विक्रमी नोंदणी; मुद्रांक शुल्कातून 1,223 कोटींचा महसूल
Real Estate :मुंबईच्या मालमत्ता बाजाराची भरारी! जुलैत 14 वर्षांतील विक्रमी नोंदणी; मुद्रांक शुल्कातून 1,223 कोटींचा महसूलchatgpt
Published On

मायानगरी मुंबईत प्रत्येकाच घर घ्यायचं स्वप्न असते. यंदा मुंबईकरांची घर खरेदीत मोठा उत्साह पाहायला मिळाला आहे. मुंबईत जुलै 2026 मध्ये घर खरेदी करणाऱ्यांकडून उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास 13, 617 मालमत्तांची नोंदणी झाली आहे. यामुळे रिअल इस्टेट बाजाराने आजपर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला आहे.

मुंबईतील रिअल इस्टेट बाजाराने जुलै 2026 मध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. नाईट फ्रँक इंडियाने महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक विभागाच्या आकडेवारीच्या आधारे केलेल्या विश्लेषणानुसार, मुंबई महानगरपालिका (BMC) हद्दीत जुलै महिन्यात 13,617 मालमत्तांची नोंदणी झाली असून, हा गेल्या 14 वर्षांतील जुलै महिन्यातील सर्वाधिक आकडा आहे.

Real Estate :मुंबईच्या मालमत्ता बाजाराची भरारी! जुलैत 14 वर्षांतील विक्रमी नोंदणी; मुद्रांक शुल्कातून 1,223 कोटींचा महसूल
LPG Rate Today : LPG सिलिंडर झाला स्वस्त! नवे दर जाहीर; तुमच्या शहरातले दर काय?

जुलै 2025 मध्ये 12,579 मालमत्तांची नोंदणी झाली होती. त्या तुलनेत यंदा 8.3 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच, जून 2026 च्या तुलनेतही नोंदणीमध्ये सुमारे 2 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली.

मालमत्ता व्यवहार वाढल्याने राज्य सरकारच्या महसुलातही मोठी भर पडली आहे. मुद्रांक शुल्कातून जुलै 2026 मध्ये 1,223 कोटींचा महसूल मिळाला असून, तो गेल्या वर्षीच्या 1,123 कोटींच्या तुलनेत 8.9 टक्क्यांनी अधिक आहे. जूनच्या तुलनेत मुद्रांक शुल्क महसुलात 13 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Real Estate :मुंबईच्या मालमत्ता बाजाराची भरारी! जुलैत 14 वर्षांतील विक्रमी नोंदणी; मुद्रांक शुल्कातून 1,223 कोटींचा महसूल
PM-किसान योजनेबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय! 9 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना होणार फायदा

नाईट फ्रँक इंडियाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी सांगितले की, मालमत्तांच्या किंमती वाढत असतानाही उच्च मूल्याच्या आणि दर्जेदार निवासी प्रकल्पांना ग्राहकांची मागणी कायम आहे. मुंबईची मजबूत अर्थव्यवस्था, वेगाने विकसित होत असलेल्या पायाभूत सुविधा आणि दीर्घकालीन गुंतवणुकीची क्षमता यामुळे रिअल इस्टेट बाजाराला सातत्याने बळ मिळत आहे.

Real Estate :मुंबईच्या मालमत्ता बाजाराची भरारी! जुलैत 14 वर्षांतील विक्रमी नोंदणी; मुद्रांक शुल्कातून 1,223 कोटींचा महसूल
Namo Shetkari Yojana : कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 'नमो शेतकरी' योजनेचा लाभ मिळणार नाही? 56 लाख शेतकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता

यंदाच्या वर्षात मार्चमध्ये 15,983, एप्रिलमध्ये 14,285, मेमध्ये 12,403, जूनमध्ये 13,413 आणि जुलैमध्ये 13,617 मालमत्ता नोंदणी झाल्याने मुंबईतील निवासी मालमत्ता बाजाराची मजबूत घोडदौड कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) पायाभूत सुविधा प्रकल्प, अंतिम ग्राहकांकडून वाढती मागणी आणि प्रीमियम घरांकडे असलेला कल यामुळे आगामी काळातही मालमत्ता बाजाराची वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com