PM-किसान योजनेबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय! 9 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना होणार फायदा

PM Kisan Scheme Extended Till 2031 Benefits Details: मोदी सरकारने पीएम किसान योजनेला 2030-31 पर्यंत मुदतवाढ दिली असून 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. ऑक्टोबरमध्ये 24 वा हप्ता जमा होण्याची शक्यता.
PM KISAN SCHEME EXTENDED TILL 2031 | 9 CRORE FARMERS TO BENEFIT
PM KISAN SCHEME EXTENDED TILL 2031 | 9 CRORE FARMERS TO BENEFITsaam tv
Published On

मोदी सरकारने कॅबिनेट बैठकीत आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, पीएम किसान ही योजना पुढील पाच वर्षांसाठी म्हणजेच 2030-31 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यासाठी 3.15 लाख कोटी रुपयांच्या खर्चाला मंजूरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच मोदी सरकारने प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेला देखील मंजूरी दिली आहे. दरम्यान पीएम-किसान योजनेबाबत ही आनंदाची बातमी अशा वेळी आली आहे. ज्यावेळी लाभार्थी शेतकरी 24 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 24 वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात वितरित केला जाण्याची शक्यता असून सूत्रांनुसार नवरात्रीच्या काळात हा हप्ता जमा केला जाऊ शकतो.

PM KISAN SCHEME EXTENDED TILL 2031 | 9 CRORE FARMERS TO BENEFIT
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता 'या' दिवशी खात्यात होणार जमा

23 हप्त्यामध्ये 4.47 लाख कोटी रुपये जमा

पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 23 हप्त्यामध्ये 4.47 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. 23 व्या हप्त्याद्वारे 9.49 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा झाला. आकडेवारीनुसार, सरकारने लाभार्थ्यांच्या खात्यात 18,984 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली होती. कोरोनासारख्या महामारीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी 1.71 लाख कोटी रुपयांहून अधिक निधी वितरित करण्यात आला. तसेच PM-KISAN अंतर्गत महिला शेतकऱ्यांना 1.06 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली असून, दर चार लाभार्थयांमध्ये जवळपास एक महिला शेतकरी आहे.

PM KISAN SCHEME EXTENDED TILL 2031 | 9 CRORE FARMERS TO BENEFIT
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्यात ₹3000 ची वाढ होणार? कृषिमंत्र्यांनी स्पष्ट उत्तर देत सगळंच सांगितलं

२०१९ मध्ये सुरू केली होती योजना

ही योजना २०१९ मध्ये सुरू करण्यात आली होती. योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे त्यांच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यांमध्ये २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये जमा केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com