tuljabhavani temple  Saam tv
महाराष्ट्र

Tulja Bhavani Mandir : तुळजाभवानी मंदिर नव्यानं उभारणार, ऑडिट रिपोर्ट आला, नेमकं कारण काय?

Renovation Process: महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. हे तुळजाभवानीचे मंदिर आता नव्याने उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

Saam Tv

धारशिव : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरू आहे. या दृष्टीने मंदिराच्या शिखराच्या दुरुस्तीचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मंदिरातील टाईल्स काढताना शिखराचा भार पेलणाऱ्या चार बीमपैकी दोन बीम जीर्ण झाल्याचे आढळले. यामुळे मंदिराच्या गर्भगृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. ज्यामध्ये संपूर्ण शिखर काढण्याची आवश्यकता असल्याचे जाणवले.

या संदर्भात मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, पुरातत्व विभागाच्या नियमानुसार आणि कायद्यानुसार मंदिराच्या नव्याने बांधणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी मंदिर पुन्हा जुन्या पद्धतीने बांधले जाणार असून, देवीची मूर्ती दोन वर्षांसाठी हलवण्याबाबत धर्मगुरू आणि धर्मशास्त्र अभ्यासक यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.

मंदिराच्या गर्भगृहाच्या दुरुस्तीच्या कालावधीत देवीची मूर्ती मंदिरातील इतर सिंह गाभारा किंवा दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा पर्याय विचार आहे. यासंदर्भात पुढील काही दिवसांत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासोबत बैठक घेण्यात येणार असून, त्यात अंतिम निर्णय घेतला जाईल.

भाविकांना देवीच्या दर्शनासाठी कोणती व्यवस्था करता येईल, धार्मिक विधी कशा प्रकारे पार पडतील, तसेच दर्शनासाठी भक्तांना कमीत कमी त्रास होईल याची सोय कशी करता येईल, याबाबतचा अहवाल तयार करून जनतेसमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

तुळजाभवानी मंदिराच्या या ऐतिहासिक जीर्णोद्धार प्रक्रियेमुळे भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या मंदिराच्या बांधकामाला दोन वर्षे देखील लागू शकतात, असे मंदिराचे ट्रस्टी राणाजगजीतसिंह पाटील यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT