बालाजी सुरवसे
धाराशिव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळा उत्साहात साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी मिरवणूक काढण्यात येत आहेत. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील पारा येथे काढण्यात आलेल्या सार्वजनिक शिवजयंती रॅलीत फटाके फोडताना स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले असून दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. ठिकठिकाणी रॅली काढत फटाक्यांची आतिषबाजी, फुलांची उधळण करण्यात येत आहे. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यामधील पारा याठिकाणी सार्वजनिक शिवजयंती समितीच्यावतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीला सुरवात झाल्यानंतर यात फटाके फोडले जात होते. याच दरम्यान मोठा स्फोट झाल्याची घटना घडली.
आवाजाच्या दगडी तोफेत स्फोट
शिवजयंती निमित्ताने काढण्यात आलेल्या मिवरणुकीत फटाके फोडण्यासोबतच दगडी तोफ देखील होती. या तोफेतून आवाजाची दारू उडवताना स्फोट झाला. यामुळे मोठा आवाज झाल्याने मिवरणुकीत गोंधळ उडाला होता. दरम्यान दारूचा स्फोट झाल्याने याठिकाणी झालेल्या फटाका स्पोटात मिरवणुकीतील दोनजण जखमी झाले आहेत. या दोन्ही जखमींना लागलीच धाराशिवच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गव्हाच्या पेरणीतून साकारली शिवरायांची प्रतिमा
लोणी (अहिल्यानगर) : अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथील शिवभक्त तरूणाने शिवरायांना आगळ्या वेगळ्या पद्धतीने अभिवादन केले. तरूण शेतकरी कुणाल विखे याने आपल्या शेतात गव्हाची पेरणी करत शिवरायांची प्रतीमा साकारली आहे. हि प्रतीमा तयार होण्यासाठी पंधरा दिवसांचा अवधी लागला असून शिवरायांची ही शिवप्रेमांसाठी आकर्षणाचा विषय ठरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.