Jalgaon News : आईला मिसळ आणण्यास सांगितलं, परत येताच लेकाला पाहून बसला धक्का, जळगावात सुट्टीवर आलेल्या जवानाचं काय झालं?

jalgaon : दीपक निकम हे २०१५ पासून सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत. दहा दिवसांपुर्वीच दीपक हे एक महिन्याच्या रजेवर गावी आले होते. दरम्यान १८ फेब्रुवारीला सकाळी उठल्यानंतर दीपक काही वेळ गावात फिरायला गेले
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv
Published On

जळगाव : भारतीय सीमा सुरक्षा दलात कार्यरत जवान एक महिन्याच्या सुट्टीवर गावी आले होते. या दरम्यान सकाळी त्यांनी आईला मिसळ आणण्यास सांगितले. मुलाने सांगितल्याप्रमाणे आई मिसळ आणण्यासाठी बाहेर गेली असताना त्यांनी टोकाचा निर्णय घेत आपले जीवन संपविले आहे. काही वेळाने आई घरी परतली असताना दरवाजा उघडताच मुलाने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. 

जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील दीपक अशोक निकम (वय ३८) असे मयत तरुणाचे नाव आहे. दीपक निकम हे २०१५ पासून सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत. दहा दिवसांपुर्वीच दीपक हे एक महिन्याच्या रजेवर गावी आले होते. दरम्यान १८ फेब्रुवारीला सकाळी उठल्यानंतर दीपक काही वेळ गावात फिरायला गेले. त्यानंतर सकाळी आठच्या सुमारास घरी आल्यानंतर त्यांनी आई धोंडाबाई यांना मिसळ आणायला सांगितली. 

Jalgaon News
Kopargaon Crime : साई भक्तांना बंदुकीचा धाक दाखवून लूटमार; सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद

मिसळ घेऊन आलेल्या आईला बसला धक्का 

मुलाने सांगितल्याप्रमाणे आई मिसळ घेण्यासाठी गेली. यावेळी घरी कोणीही नसताना मधल्या घरात जाऊन दीपक यांनी गळफास घेत आत्महत्या केली. साधारण अर्ध्या तासाने आई मिसळ घेऊन घरी परतल्या. त्यांनी दरवाजा लोटून उघडला असता समोर दीपक गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. मुलाचा मृतदेह पाहून धोंडाबाई यांनी जोरात आरोड्या मारत आक्रोश केला. आवाजामुळे शेजाऱ्यांनी धाव घेतली. 

Jalgaon News
Yavatmal Police : १३ वर्षापासून नाव बदलून यवतमाळ जिल्ह्यात वास्तव्य; दीड महिन्याच्या मागोव्यानंतर नक्षलवाद्याला अटक

कुटुंबीयांचा आक्रोश 

यानंतर दिपकला खाली उतरवून जिल्‍हा रुग्णालयात नेण्यात आले. तपासणी अंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दीपकला मृत घोषित केले. दरम्यान दिपकने टोकाचा निर्णय कोणत्या कारणाने घेतला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दिपकच्या मृत्यूच्या घटनेने नातेवाईक, कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दीपकच्या मृत्युने आई- वडीलांनी वृद्धापकाळाचा आधार गमावला आहे. तर दोघा मुलांचे पित्रृछत्र हरपले आहे. सदर घटनेप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com