'आई तुळजाभवानी' (Aai Tuljabhavani) या मालिकेत देवींसाठी पृथ्वीवर येऊन भवानीशंकर रूपात राहिलेले महादेव आणि आपल्या आई-वडिलांना एकत्र आणण्यासाठी धडपडणारे बालगणेश आणि अशोकसुंदरी हा गोष्टीचा टप्पा अंतिम चरणात आहे. हा टप्पा कसा उलगडणार,देवींना महादेवांचे सत्य कसे कळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. भवानी शंकरच महादेव आहेत हे कळल्यावर मालिका कुठले नवे वळण घेणार आहे. बालगणेश आणि अशोकसुंदरीने, देवींसाठी तुळजापुरात वाड्याची निर्मिती करण्याची विनंती करण्यामागची प्रेरणा आईवडिलांना एकत्र आणावी हीच होती.
वाड्याची निर्मिती त्यापाठोपाठ कल्लोळ तीर्थ, गायमुख तीर्थ यांच्या निर्मिती मागची गोष्ट प्रेक्षकासमोर उलगडत असतानाच देवीला भवानीशंकर यांच्या रूपाबद्दल येणारी शंका आणि अखेर महादेवांचे खरे रूप नाट्यमयरित्या उघड होणे हा अत्यंत रोमहर्षक कथाभाग गुरुवार २० फेब्रुवारी ते शनिवार २२ फेब्रुवारीच्या भागांमध्ये दररोज रात्री नऊ वाजता उलगडणार आहे. याचा कळससाध्य येत्या रविवार २३ फेब्रुवारीच्या महाएपिसोड मध्ये होणार असून महादेव आणि संपूर्ण कुटुंबाने सत्य लपवल्याने व्यथित झालेल्या देवीच्या रागात महिषासुराने केलेल्या आगळीकीने भर पडणार आहे आणि आई तुळजाभवानीचे आजवर कधीही न पाहिलेले न भूतो न भविष्यति महाकाली रूप प्रेक्षकांना दिसणार आहे.
याबाबत बोलताना पूजा काळे म्हणाली, "मालिकेमध्ये एक नवं वळण येणार आहे प्रेक्षकांना आई तुळजाभवानीचे महाकाली रूप पाहायला मिळणार आहे. हे रूप हुबेहूब साकारण्यासाठी म्हणजेच मेकअप, आभूषणे, पेहराव हे सगळे मिळून मला ३-४ तासांचा कालावधी लागला. वेगवेगळ्या प्रकारचे हार, मुकुट घालून पाहिले कारण आम्हांला कुठल्याही प्रकारची कसर सोडायची नव्हती. माझी अशी नाही पण संपूर्ण टीमची यामागे अफाट मेहनत होती. मी पहिल्यांदाच असं रूप धारण करत होते त्यामुळे दडपण होतंच, पण मला ऊर्जा मिळतं गेली आणि मी तसं काम करत गेली. मला आशा आहे तुम्हाला देखील आवडेल."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.