truck drivers chakka jam andolan at nagpur bhandara highway saam tv
महाराष्ट्र

Hit And Run New Law: ट्रक चालकांचा नव्या कायद्याला विरोध; नागपूर- भंडारा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलनास प्रारंभ

chakka jam news : शहरात इतरही ठिकाणी विविध मार्गावर आंदोलन सुरू आहे.

Siddharth Latkar

- पराग ढाेबळे / संजय जाधव

Truck Dirver Strike :

अपघातानंतर जखमींना मदत न करता पळून जाणाऱ्या वाहन चालकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या या नव्या निर्णयाच्या विरोधात ट्रक चालकांनी नागपूर भंडारा राष्ट्रीय महामार्गावर (nagpur bhandara highway) ट्रक चालकांनी चक्काजाम आंदोलन (chakka jam andolan) सुरू केले आहे. (Maharashtra News)

नव्या कायद्यात वाहन चालक खास करून ट्रक चालकांविरोधात एकतर्फी कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. अपघाताच्या स्थळावर थांबल्यावर लोक ट्रक चालकाला मारहाण करतात म्हणून ट्रकचालक पळून जातात. मात्र नंतर ते पोलिसांपर्यंत जाऊन माहिती देतात असे एक चालकाने साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

त्यामुळे हा कायदा अपघात घडवणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात आहे अशी प्रतिक्रिया देत ट्रकचालकांनी हे चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. शहरात इतरही ठिकाणी विविध मार्गावर आंदोलन सुरू आहे.

बुलढाणा जिल्ह्यातही आंदाेलनास प्रारंभ

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मलकापूर - घोडसगाव नजिक रस्त्यावर टायर जाळून महामार्ग अडविला. गेल्या एक तासांपासून महामार्ग अडवून वाहन चालक घोषणाबाजी करीत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान अपघात झाल्यानंतर पळून जाणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या नवीन नियमाला वाहन चालकांनी विरोध दर्शविला आहे. या आंदाेलनामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान आंदोलनस्थळी पोलिस दाखल झाले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT