- अजय सोनवणे
रस्ते आपघाताबाबत सरकारच्या जाचक व अन्यायकारक कायद्याच्या निषेधार्थ वाहन चालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे. यामध्ये मनमाडच्या पेट्रोलियम प्रकल्पातील इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनीही (Petroleum Strike News) सहभाग नाेंदविला. (Maharashtra News)
यामुळे मनमाड जवळच्या हिंदुस्तान पेट्रोलियम,भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या इंधन प्रकल्पातून होणारा पुरवठा ठप्प होणार आहे. परिणामी राज्यातील पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सरकारने अपघाताबाबत केलेल्या कायद्यामध्ये दहा वर्षांच्या शिक्षा आणि सात लाख दंड प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याविरोधात चालकांमध्ये तीव्र भावना उमटल्या असून त्याविरोधात चालकांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
Edited By : Siddharth Latkar