Chandrapur ST Bus Accident Saam Tv
महाराष्ट्र

Accident: प्रवाशांनी खचाखच भसलेली एसटी बस उलटली, दोघांचा जागीच मृत्यू; चंद्रपूरमध्ये खळबळ

Chandrapur ST Bus Accident: चंद्रपूरमध्ये एसटी बसला भीषण अपघात झाला. एसटी बस रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.

Priya More

संजय तुमराम, चंद्रपूर

चंद्रपूरमध्ये एसटी बसला भीषण अपघात झाला. भरधाव एसटी बस महामार्गावर उलटली. या अपघातामध्ये दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर ८ जण गंभीर जखमी झाले. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना चिमूर-वरोरा महामार्गावर घडली. अपघातानंतर चंद्रपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूरमध्ये भरधाव एसटी बस रस्त्याच्या कडेला उलटून मोठा अपघात झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर- वरोरा मार्गावरील चारगावजवळ ही घटना घडली. ही एसटी बस चिमूरवरून चंद्रपूरकडे जात होती. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे ही एसटी बस रस्त्याच्या कडेला खड्ड्यात उलटली. त्यामुळे एकच गोंधळ उडाली. अपघातानंतर बसमधील प्रवासी मदतीसाठी ओरडत होते.

हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये बसमधील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. ८ जण गंभीर जखमी झालेत. अपघातामध्ये १५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये बसच्या वाहकाचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या बसमधून ३५ जण प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने तात्काळ जखमी प्रवाशांना उपचारासाठी चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. या अपघाताचा तपास सध्या पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Job Offer : परदेशात नोकरी मिळवण्याच्या स्वप्नातून फसवणूक, पालघरच्या तरुणाची व्हिडीओद्वारे मदतीची विनंती

Maharashtra State Film Awards : काजोल ते महेश मांजरेकर; कोणाला कोणता पुरस्कार मिळाला? वाचा सविस्तर यादी

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षण लढ्यातील विजयाशिवाय फेटा बांधणार नाही - मनोज जरांगे पाटील

Nashik politics : नाशिकचे राजकारण पुन्हा पेटणार, ध्वजारोहणाचा मान कुणाला? महाजन, भुसेंना कॉर्नरकडून भुजबळांना मान?

Ladki Bahin Yojana: २७ लाख 'लाडकी'च्या घरी पोहचणार अंगणवाडीच्या ताई, कोणते प्रश्न विचारणार? वाचा पडताळणीचे निकष

SCROLL FOR NEXT